सातपूरला बस जाळण्याचा प्रयत्न, बाजार बंद
By admin | Published: October 10, 2016 12:27 AM2016-10-10T00:27:06+5:302016-10-10T03:03:01+5:30
सातपूर : त्र्यंबकेश्वर तालुक्यातील तळेगाव येथे घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ अज्ञात इसमांनी शहर वाहतूक शाखेच्या बसवर दगडफेक करून बस जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला. याबाबत सातपूर पोलीस ठाण्यात अज्ञात इसमांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

त्र्यंबकेश्वर तालुक्यातील तळेगाव येथील अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याच्या निषेधार्थ नाशिक-त्र्यंबक रस्त्यावरील सातपूरच्या प्रतीक्षा हॉटेलसमोर दोन-तीन अज्ञात इसमांनी शहर वाहतूक शाखेच्या (बस क्र . एम. एच. २० डी. ८६५४) बसवर दगडफेक करून काचा फोडण्यात आल्या. तसेच बसच्या सीटवर पेट्रोल टाकून बस जाळण्याचा प्रयत्न केला आहे. यात तीन-चार सीट जळाल्याने बसचेे नुकसान झाले आहे. याबाबत बसचालक अशोक पंढरीनाथ खोडे यांनी सातपूर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. सातपूर पोलिसांनी अज्ञात लोकांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
या घटनेच्या निषेधार्थ सातपूर गावातील व्यापार्यांनी आपले व्यवहार पूर्णपणे बंद ठेवले होते. या बंदमध्ये भाजीविक्रे ते, श्री छत्रपती शिवाजी महाराज मंडईतील सर्व व्यापारी, मंडई बाहेरील व्यापारी सहभागी झाले होते, तर रात्री परिसरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी दांडिया बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. (वार्ताहर)
०९ सातपूर मंडई ०९ सातपूर बस- आर फोटोवर सेव्ह