ड्रॅगनचा तीळपापड! भारतीय जवानांनी चीनकडून नियंत्रण रेषा बदलण्याचा प्रयत्नच पाडला हाणून
By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2020 03:48 AM2020-06-26T03:48:19+5:302020-06-26T06:58:55+5:30
चीनने फौजा वाढवल्यावर भारतानेही प्रत्युत्तर दिल्यानेच ड्रॅगनचा तिळपापड झाला.
टेकचंद सोनवणे
नवी दिल्ली : पूर्व लडाखमधील गलवान खोऱ्यात हेकेखोर चीनलाभारताने राजनैतिक स्तरावरही कठोर शब्दात सुनावले आहे . चीनचे वर्तन दोन्ही देशांच्या आतापर्यंतच्या संबंधांना साजेसे नाही. भारताने कधीही कुणाही देशाच्या हद्दीत प्रवेश करण्याचा प्रयत्न केला नाही. प्रत्यक्ष नियंत्रण रेषा कधीही बदलली नाही, अशा शब्दात भारताने चीनचा कांगावा जगासमोर आणला. मेपासूनच चीनने नियंत्रण रेषेनजीक फौजफाटा वाढवला. १९९३ च्या शांतता व सौहार्द कराराचे ते उल्लंघन होते, अशी आठवण भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने करून दिली. चीनने फौजा वाढवल्यावर भारतानेही प्रत्युत्तर दिल्यानेच ड्रॅगनचा तिळपापड झाला.
भारतीय जवानांना गस्त घालण्यापासून रोखण्याचा प्रयत्न करण्यात आला. जे बांधकाम झाले ते भारताने स्वत:च्याच हद्दीत केले. गलवान खोºयातील झटापटीला केवळ चीन जबाबदार आहे, असे परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केले. दोन्ही देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांमध्ये १७ जूनला चर्चा झाली. त्यानुसारच चीनने काम करावे. सतत हेच सुरू राहिले तर दोन्ही देशांचे संबंध बिघडण्यासच कारणीभूत ठरेल, असे भारताने ठणकावले. मे महिन्यापासूनच चीनने आपले सैनिक वाढवले. भारतानेही प्रत्यूत्तरात जादा कुमक मागवली. दोन्ही देशांमध्ये लष्करी व राजनैतिक स्तरावर चर्चा सुरू असल्याचेही परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अनुराग श्रीवास्तव यांनी नमूद केले. हिंसक झटापटीनंतर दहा दिवसांनी अखेर चिनी फौजा मागे हटल्या. भारताचा हा मोठा विजय मानला जातो. मात्र पँगाँग सरोवरानजीक प्रत्यक्ष नियंत्रण रेषेच्या हद्दीत चीनने बांधकाम सुरूच ठेवले आहे.
गलवान खोºयातील झटापटीनंतर दोन्ही देशांनी आपापल्या हद्दीत लष्करी हालचाली वाढवल्या, मोठ्या प्रमाणावर फौजफाटा तैनात केल्याचेही परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले. गलवान खोºयावर हक्क सांगून चीनचे रडगाणे तरिही सुरू च आहे. बीजिंगमधून हक्क सांगायचा तर भारतात चीनचे राजदूत मात्र सौहार्दाचा कांगावा करीत आहेत. पहिल्यांद्याच चिनी परराष्ट्र मंत्रालयाच्या विधानात 'चीनची भारतासोबत काम करून दोन्ही देशांचे संबंध सुधारणे, शांतता प्रस्थापित करण्याची तयारी आहे' असा साळसूद आव दिसत आहे. भारत सतर्क आहे. चर्चा सुरू असली तरी गलवान खोºयातून लष्करास अद्याप माघारी बोलावले जाणार नाही.
१५ जूनला झालेल्या झटापटीत भारतीय जवानांनी उध्वस्त केलेला चिनी मंडप पुन्हा त्याच ठिकाणी उभारण्यात आल्याचे वृत्त पसरले होते. सॅटेलाईट इमेजचा आधार त्यासाठी प्रसारमाध्यमांमध्ये घेतला जात होता. लष्कराकडून मात्र अशी कोणताही माहिती देण्यात आली नाही. चीन चचेर्पासूनही पळ काढत आहे. भारताने बीजिंगमधील चिनी लष्करप्रमुखांशी चचेर्ची मागणी केली होती. त्यासाठी हॅटलाईनदेखील उभारण्यात येणार होती. मात्र चीनने यासाठी तयारी दर्शवली नाही. तिबेट व शिनजियांग प्रांताच्या सीमेवर तैनात सर्वोच्च अधिकाऱ्यांमध्ये चचेर्चा प्रस्ताव चीनकडून पुढे करण्यात आला.
>लष्करप्रमुखांची बैठक
लडाखचा दौरा आटोपून दिल्लीत परतल्यानंतर लष्करप्रमुख मनोज मुकुंद नरवणे यांनी वरिष्ठ लष्करी व संरक्षण मंत्रालयातील अधिकाºयांशी चर्चा केली. ड्रॅगनचे मनसुबे त्यांनी या बैठकीत सांगितले.नरवणे यांनी दोन्ही दलाच्या प्रमुखांशीदेखील चर्चा केली.
गलवान संघर्षात हवाई दलाची भूमिका महत्त्वीच असेल. पूर्व लडाखमध्ये चीनने फौजफाटा काही प्रमाणात वाढवला होता. भारतानेही आपल्या हद्दीतील ६५ पोस्टमध्ये जवानांची संख्या वाढवली आहे.