पोलिसांच्या सतर्कतेमुळे फसला कंटनेर लुटीचा प्रयत्न
By Admin | Published: October 30, 2016 10:46 PM2016-10-30T22:46:31+5:302016-10-30T22:46:31+5:30
नाशिक : पंचवटी महाविद्यालयासमोरील उड्डाणपुलावर कंटेनरचालकास लुटल्याचा प्रयत्न पोलिसांच्या गस्तीपथकामुळे फसला़ पोलिसांनी दोन संशयितांना अटक केली असून, तीन जण फरार झाले आहेत़ याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
न शिक : पंचवटी महाविद्यालयासमोरील उड्डाणपुलावर कंटेनरचालकास लुटल्याचा प्रयत्न पोलिसांच्या गस्तीपथकामुळे फसला़ पोलिसांनी दोन संशयितांना अटक केली असून, तीन जण फरार झाले आहेत़ याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़आडगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पंचवटी दंत महाविद्यालयासमोरील उड्डाणपुलावर रविवारी (दि़३०) दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास एक कंटेनर थांबलेला होता़ त्याचवेळी विरुद्ध दिशेने जात असलेल्या आडगाव पोलीस ठाण्याच्या गस्तीपथकातील कर्मचार्यांना कंटेनरचालकाच्या संशयास्पद हालचाली आढळून आल्या़ त्यांनी विरुद्ध बाजूने जाऊन कंटेनरजवळ पोहोचले असता त्यांना पाहून तीन संशयित काळ्यापिवळया वाहनातून पसार झाले, तर उर्वरित मोहम्मद नादीर शहा, उबेद शेख सफदार (रा. शिवाजी चौक) या दोघांना आडगाव पोलीस ठाण्याचे कर्मचारी दिलीप भोई, खालकर, दीपक दिवटे यांनी शिताफीने पकडले़संशयित शहा व सफदार या दोघांचीही पोलिसांनी झडती घेतली असता त्यांच्याकडे चॉपर, चाकू तसेच लुटीचे २२ हजार रुपये आढळून आले़ याप्रकरणी कंटेनरचालक शेख मोहम्मद शफीक समद (रा. कानपूर, जि. राजगड मध्य प्रदेश) याच्या फिर्यादीनुसार पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान फरार झालेल्या तिघा कर्मचार्यांचा पंचवटी पोलीस शोध घेत आहेत़ (प्रतिनिधी)