आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताची प्रतिमा मलिन करण्याचे प्रयत्न- पंतप्रधान मोदी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2022 09:28 AM2022-01-21T09:28:58+5:302022-01-21T09:29:16+5:30

जगाला भारताची खरी ओळख करून देणे गरजेचे

Attempts to tarnish Indias image at the international level says pm Modi | आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताची प्रतिमा मलिन करण्याचे प्रयत्न- पंतप्रधान मोदी

आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताची प्रतिमा मलिन करण्याचे प्रयत्न- पंतप्रधान मोदी

Next

नवी दिल्ली : भारताची प्रतिमा मलिन करण्याचे वेगवेगळे प्रयत्न सुरू आहेत. तुम्ही सर्व जण याचे साक्षीदार आहात. आंतरराष्ट्रीय स्तरावरही बरेच प्रयत्न चालू आहेत. हे निव्वळ राजकारण आहे, असे सांगून आपण यापासून दूर जाऊ शकत नाही. जगाला भारताची खरी ओळख करून देणे हे आपले कर्तव्य आहे, असे असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी केले.  

माउंट अबू येथील बह्मकुमारीज संस्थानतर्फे आयाेजित कार्यक्रमात पंतप्रधान माेदींनी व्हर्च्युअल पद्धतीने सहभाग घेतला. त्यावेळी त्यांनी सांगितले, की भारताची प्रतिमा मलिन करण्याचे वेगवेगळे प्रयत्न सुरू आहेत. हे राजकारण नसून आपल्या देशाचा प्रश्न आहे. ब्रह्मकुमारीज संस्थानसारख्या अशा संस्था ज्यांचे आंतरराष्ट्रीय पातळीवर अस्तित्व आहे, त्यांनी जगासमाेर भारताची खरी प्रतिमा पाेहाेचवायला हवी. भारताबद्दल ज्या अफवा पसरविण्यात येत आहेत, त्यांचे सत्य जगासमाेर आणून आंतरराष्ट्रीय समुदायाला भारताबाबत जागरूक करावे, हे आपले सर्वांचे कर्तव्य आहे, असे माेदी म्हणाले.
 
माेदींनी सांगितले, की आपण नवीन भाारताची निर्मिती करीत आहाेत. त्यात भेदभावाला कुठलीही जागा राहणार नाही. समानता व सामाजिक न्यायाच्या भक्कम पायावर उभा असलेला समाज आपण बनवीत आहाेत. या भारताचा विचार आणि दृष्टिकाेन पूर्णपणे नवा आहे. राष्ट्राच्या प्रगतीमध्येच आपली प्रगती आहे. राष्ट्रासाेबतच आपलेही अस्तित्व आहे. ही जाणीव या नव्या भारताच्या निर्मणामध्ये आपली सर्वांत माेठी शक्ती आहे, असे माेदी म्हणाले.

महिलांचा गाैरव
राणी चेन्नम्मा, मातंगिनी हाजरा, राणी लक्ष्मीबाई, कित्तूरच्या वीरांगना झलकारीबाईपासून ते अहिल्याबाई होळकर आणि सावित्रीबाई फुले यांनी सामाजिक क्षेत्रात भारताची अस्मिता जपली. जेव्हा जग गडद अंधारात होते, स्त्रियांबद्दल जुन्या विचारसरणीत अडकले होते, तेव्हा भारत माता शक्तीची देवीच्या रूपात पूजा करत असे. आमच्याकडे गार्गी, मैत्रेयी, अनुसूया, अरुंधती आणि मदालसा यासारख्या विद्वान स्त्रियांनी समाजाला ज्ञान दिले, अशा शब्दांमध्ये पंतप्रधान माेदींनी महिलांचा गाैरव केला.

Web Title: Attempts to tarnish Indias image at the international level says pm Modi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.