जल लवादाच्या भूमिकेकडे लक्ष
By admin | Published: May 7, 2014 12:04 AM2014-05-07T00:04:52+5:302014-05-07T00:31:03+5:30
डिचोली : महाराष्ट्र सरकारने गोव्याच्या सीमेवरील विर्डी येथील कीका नाला येथे धरणाचा प्रस्ताव कार्यान्वित करत उंची वाढवल्याने गोव्याने आक्षेप घेतलेला असून म्हादई जल लवादासमोर हा मुद्दा उपस्थित करण्यासाठी गोव्याने तयारी केली आहे. विर्डी धरण वाळवंटी नदी गिळंकृत करण्याचा धोका असून कर्नाटकानंतर महाराष्ट्रानेही गोव्याला कात्रीत पकडण्याचा सपाटा लावला आहे.
डिचोली : महाराष्ट्र सरकारने गोव्याच्या सीमेवरील विर्डी येथील कीका नाला येथे धरणाचा प्रस्ताव कार्यान्वित करत उंची वाढवल्याने गोव्याने आक्षेप घेतलेला असून म्हादई जल लवादासमोर हा मुद्दा उपस्थित करण्यासाठी गोव्याने तयारी केली आहे. विर्डी धरण वाळवंटी नदी गिळंकृत करण्याचा धोका असून कर्नाटकानंतर महाराष्ट्रानेही गोव्याला कात्रीत पकडण्याचा सपाटा लावला आहे.
ऑक्टोबर २०१३ ला महाराष्ट्राने खास पूर्वतयारी आखून म्हादईचे पाणी वापरण्याचा चंग बांधला आहे. गोव्याला तिळारीचे पाणी महाराष्ट्राच्या वाट्यापेक्षा अधिक मिळत असल्याने हा धरणाचा प्रस्ताव कार्यान्वित केला आहे.
महाराष्ट्राने कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता तसेच आपला मसुदा म्हादई जल लवाद किंवा गोवा सरकारला सादर न करता काम हाती घेतलेले आहे. सध्या निधीअभावी काम थांबवण्यात आलेले असले तरी पुन्हा काम सुरू करण्याच्या हालचालींना वेग आला आलेला आहे.
कीका नाला ेयथील धरण प्रकल्पातून महाराष्ट्र १४.१३८ ............... पाणी साठवण्याच्या तयारीत आहे. २००६ साली फवाची कोण येथे गोव्याच्या सीमेपासून ५०० मीटर अंतरावर धरणाला गोवा सरकारने अतिरिक्त पाणी अंजुणे धरणात सोडण्याच्या अटीवर मान्यता दिली होती.
परंतु गोवा सरकारला अंधारात ठेवून महाराष्ट्राने धरणाची जागा बदलून कीका नाला येथे काम सुरू केले.
या प्रकल्पास म्हादई बचाव अभियानाने तीव्र विरोध करताना आवाज उठवला होता.
मात्र सर्व नियम धाब्यावर बसवून महाराष्ट्राने धरणाची उंची मोठ्या प्रमाणात वाढवली आहे. दोडामार्गचे माजी आमदार दीपक केसकर यांनी सरकारला धरणाची उंची वाढवण्याची विनंती केल्याचे सांगितले. त्यानुसार सरकारने मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेऊन उंची वाढवला आहे.
या पार्श्वभूमीवर वाळवंटी नदीवर संकट ओढवण्याचा धोका निर्माण झालेला असून तीन जलशुद्धीकरण प्रकल्पांना ८२ एमएलडी पाणीपुरवठा करणारी नदी तसेच जलसिंचनासाठी ७५५१ .............. पाणी ओढणारे १६ पंप प्रत्येक १७५ क्षमतेचे या वाळवंटीच्या पाण्यावर वावरत आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात या दरणाचा फटका गोव्याला बसण्याची भीती व्यक्त करण्यात आली असून याबाबत जलसंसाधन खात्याचे अभियंता येरागी यांनी वाळवंटीवर परिणाम होण्याचे संकेत दिले आहेत. जलसंसाधन मंत्री दयानंद मांद्रेकर यांनी याप्रसंगी गोवा गंभीर भूमिका घेणार असल्याचे स्पष्ट केले.
लवादाच्या भूमिकेकडे लक्ष
विर्डी प्रकरणी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी जल लवादासमोर हा प्रश्न उपस्थित करण्याबाबत जलसंसाधन खात्याला पत्रव्यवहार करण्याचे आदेश दिलेले आहेत. जल लवादाने कर्नाटकाला प्राथमिक स्तरावर म्हादईचे पाणी वळवण्यापासून सक्त विरोध करताना मलप्रभेत जाणारे पाणी काँक्रिट घालून बंद करण्याचा आदेश दिलेला आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रालाही बेकायदा कृत्याबाबत लवादाचे त्रिसदस् मंडळ कोणती कारवाई करते याकडे गोव्याचे लक्ष आहे. (प्रतिनिधी)
फोटो ओळी-
विर्डी धरण माध्यमातून पाणी भुयारी कालवे खोदून वळवण्याची महाराष्ट्राची योजना आहे. त्यामुळे वाळवंटीवर संकट ओढवण्याचा धोका आहे. (विशांत वझे)