हृदयद्रावक! 3 वर्षांच्या मुलाने Pop-Up फटाका गिळला अन् जीव गमावला; पालकांनो वेळीच व्हा सावध
By ऑनलाइन लोकमत | Published: November 4, 2021 09:52 AM2021-11-04T09:52:45+5:302021-11-04T09:53:47+5:30
Three year old boy ate pop up crackers : तीन वर्षांच्या मुलाने पॉप-अप फटाके खाल्ल्याची घटना घडली. अतिसार आणि उलट्यांचा त्रास होऊन मुलाची प्रकृती गंभीर झाली.
नवी दिल्ली - दिवाळीसाठी आई-वडील आपल्या मुलांना विविध प्रकारचे फटाके आणतात आणि त्यांना आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करतात. पण काही पालक फटाके वाजवण्यासाठी मुलांना एकटे सोडतात आणि त्यानंतर त्यात कधी कधी गंभीर घटना देखील घडतात. अशीच एक धक्कादायक घटना आता समोर आली आहे. गुजरातच्या (Gujarat) सुरतमध्ये (Surat) अशीच एक मन सुन्न करणारी घटना घडली आहे. सुरतच्या डिंडोलीमध्ये तीन वर्षांच्या मुलाने पॉप-अप फटाके खाल्ल्याची घटना घडली. अतिसार आणि उलट्यांचा त्रास होऊन मुलाची प्रकृती गंभीर झाली. त्यानंतर त्याला उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. जिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.
पालकांना सावध करणाऱ्या या प्रकरणाबाबत बोलताना त्याच्या वडिलांनी सुरतच्या डिंडोली येथे आपल्या 3 वर्षाच्या मुलासाठी फटाके आणले होते. मूल लहान असल्याने हे फटाके फोडून झाल्यानंतर घरी सोडण्यात आलं. यानंतर मुलानं फटाखा गिळला आणि तो आजारी पडला पण त्यानंतर बरा झाला नाही. अतिसार आणि उलट्यात पॉप-अप फटाके फुटल्याने त्याला पुढील उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आणण्यात आलं अशी माहिती दिली. जिथे डॉक्टरांनी मुलाला मृत घोषित केलं आणि मुलाने फटाके खाल्ल्याबद्दल आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. यासोबतच सर्व पालकांनी दिवाळीच्या फटाक्यांपासून आपल्या मुलांना सांभाळून आणि सावध राहण्याचे आवाहन डॉक्टरांनी केलं आहे.
मुलाने फटाका केव्हा खाल्ला हे समजलं नाही
चिमुकल्याच्या पोटातून फटाका काढल्यानंतर त्याला मृत घोषित केल्याने डॉक्टरांनाही धक्का बसला आहे. मात्र, मृत्यूचं नेमकं कारण शोधण्यासाठी डॉक्टरांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. बिहारचे रहिवासी असलेले राज शर्मा हे सुतारकाम करतात. त्यांनी सांगितलं की, त्यांनी पहिल्यांदाच मुलांसाठी फटाके आणले होते. मात्र मुलाने फटाका केव्हा खाल्ला हे समजलं नाही. अत्यंत धक्कादायक प्रकरण समोर आल्यानंतर डॉक्टरांनी लोकांना सतर्क राहण्याचं आवाहन केलं आहे.
पालकांनो वेळीच व्हा सावध
राज शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, ते कुटुंबासह 8 महिन्यांपूर्वीच बिहारहून सुरतला आले होते. राज शर्मा यांचा पत्नी, 3 वर्षांचा मोठा मुलगा शौर्य आणि 2 वर्षांची मुलगी असा परिवार आहे. 24 तासांपासून शौर्य अचानक आजारी पडल्याने त्यांना त्याची काळजी वाटत होती. त्याला उपचारासाठी जवळच्या डॉक्टरांनाही दाखवण्यात आले. अचानक मुलाला उलट्या होऊ लागल्याने त्याला पुन्हा डॉक्टरांकडे नेण्यात आलं. यावर डॉक्टरांनी त्याला ड्रिप लावून सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेण्याचा सल्ला दिला. सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पोहोचल्यावर डॉक्टरांनी शौर्यला मृत घोषित केलं. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.