अतुलचंद्र कुलकर्णी यांची ‘एनआयए’मध्ये नेमणूक; मानवाधिकार आयोगात प्रवीण दीक्षित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2022 06:29 AM2022-05-13T06:29:08+5:302022-05-13T06:29:20+5:30
माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांची नियुक्ती राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या महाराष्ट्र आणि गोवा विभागासाठी विशेष प्रतिनिधी म्हणून करण्यात आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राज्याच्या कारागृह विभागाचे अप्पर पोलीस महासंचालक अतुलचंद्र कुलकर्णी यांची राष्ट्रीय तपास यंत्रणेत (एनआयए) प्रतिनियुक्तीवर नेमणूक करण्यात आली आहे. ते १९९०च्या बॅचचे महाराष्ट्र केडरचे अधिकारी आहेत. ही नियुक्ती एक वर्षासाठी असेल.
माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांची नियुक्ती राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या महाराष्ट्र आणि गोवा विभागासाठी विशेष प्रतिनिधी म्हणून करण्यात आली आहे. दीक्षित यांची नेमणूक एक वर्षासाठी असेल.
कुलकर्णी यांनी यापूर्वी एटीएस प्रमुख, मुंबई गुन्हे शाखेचे सहआयुक्त तसेच सीआयडी प्रमुख (पुणे) अशा महत्त्वपूर्ण पदांचा कार्यभार सांभाळलेला आहे. नांदेड, जळगाव, बुलडाणा, नागपूर, भंडारा येथे पोलीस अधीक्षक, तर मुंबईत देखील पोलीस उपायुक्त म्हणून काम केले आहे. सन २००२ मध्ये ते इंटेलिजन्स ब्युरोमधे रुजू झाले. कुलकर्णी यांनी केंद्रीय तपास यंत्रणेत सुमारे ११ वर्षे काम केले आहे.