ब्रह्मोस एरोस्पेसच्या प्रमुखपदी अतुल राणे यांची नियुक्ती; भारताचे नवे ‘मिसाईल मॅन’

By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2021 08:43 AM2021-12-24T08:43:28+5:302021-12-24T08:45:05+5:30

अतुल राणे हे मूळचे जळगाव जिल्ह्याच्या रावेर तालुक्यातील सावदा येथील रहिवासी आहेत.

atul rane appointed as head of brahMos aerospace india new missile man | ब्रह्मोस एरोस्पेसच्या प्रमुखपदी अतुल राणे यांची नियुक्ती; भारताचे नवे ‘मिसाईल मॅन’

ब्रह्मोस एरोस्पेसच्या प्रमुखपदी अतुल राणे यांची नियुक्ती; भारताचे नवे ‘मिसाईल मॅन’

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली : ब्रह्मोस सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्र बनविणाऱ्या ब्रह्मोस एरोस्पेस लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालकपदी मराठमोळ्या व्यक्तीची निवड झाली आहे. अतुल दिनकर राणे यांनी या पदाचा कार्यभार स्वीकारला आहे. काही वर्षांपासून ते ब्रह्माेस एराेस्पेसचे संचालक म्हणून कार्यरत हाेते. आता त्यांना या संस्थेची सर्वाेच्च जबाबदारी देण्यात आली आहे. 

ब्रह्माेस एराेस्पेस लिमिटेड ही कंपनी ‘डीआरडीओ’च्या अंतर्गत येते. ब्रह्माेस हा भारत आणि रशिया यांचा संयुक्त उपक्रम असून या संस्थेने ब्रह्माेस हे क्षेपणास्त्र विकसित केले आहे.  डीआरडीओच्या क्षेपणास्त्र विकासामध्ये राणे यांचे अतिशय महत्त्वाचे याेगदान राहिले आहे. क्षेपणास्त्रातील ऑनबाेर्ड काॅम्प्युटर्सचा विकास, मिशन साॅफ्टवेअर तसेच संरक्षण यंत्रणेसाठी आवश्यक असलेले महत्त्वपूर्ण एव्हियन तंत्रज्ञानाच्या विकासात त्यांनी महत्त्वपूर्ण कामगिरी केली आहे.

महाराष्ट्राशी नाळ

राणे हे मूळचे जळगाव जिल्ह्याच्या रावेर तालुक्यातील सावदा येथील रहिवासी आहेत. त्यांनी चेन्नई येथून इलेक्ट्राॅनिक्स ॲन्ड कम्युनिकेशनमध्ये अभियांत्रिकीची पदवी घेतली. त्यानंतर पुणे विद्यापीठातून त्यांनी ‘गायडेड मिसाईल्स’ या विषयामध्ये पदव्युत्तर अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केले. १९८७ मध्ये ते डीआरडीओमध्ये रूजू झाले.
 

Web Title: atul rane appointed as head of brahMos aerospace india new missile man

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.