Atul Subhash Suicide Case : एआय अभियंता अतुल सुभाष यांचा पगार किती होता? पत्नीला देत होते 'इतके' पैसे...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2024 18:14 IST2024-12-12T18:10:06+5:302024-12-12T18:14:56+5:30

Bengaluru Techie Atul Subhash Salary : अतुल यांच्या आत्महत्येचे कारण न्यायालयाचा आदेश नसल्याचे वकील दिनेश मिश्रा यांनी सांगितले आहे.

Atul Subhash Suicide Case:what was salary of ai engineer atul subhash he give money to his wife nikita singhania | Atul Subhash Suicide Case : एआय अभियंता अतुल सुभाष यांचा पगार किती होता? पत्नीला देत होते 'इतके' पैसे...

Atul Subhash Suicide Case : एआय अभियंता अतुल सुभाष यांचा पगार किती होता? पत्नीला देत होते 'इतके' पैसे...

Bengaluru Techie Atul Subhash Salary : एआय अभियंता अतुल सुभाष यांच्या आत्महत्येचे प्रकरण सोशल मीडियावर चांगलेच चर्चेत आले आहे. अनेकजण कलम 498 च्या न्याय्यतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत, ज्याचा अनेकदा गैरवापर केला जातो. दरम्यान, कौटुंबिक न्यायालयात अतुल सुभाष यांची केस लढणाऱ्या वकिलाने महत्त्वपूर्ण खुलासा केला आहे. 

अतुल यांच्या आत्महत्येचे कारण न्यायालयाचा आदेश नसल्याचे वकील दिनेश मिश्रा यांनी सांगितले आहे. माध्यमांशी बोलताना  वकील दिनेश मिश्रा यांनी सांगितले की, पती-पत्नी दोघेही आर्थिकदृष्ट्या मजबूत आहेत. पत्नीला चांगला पगार आहे आणि ती दिल्लीत काम करते, तर अतुल बंगळुरूमध्ये राहत होता आणि दरमहा 84,000 रुपये कमावत होता. कौटुंबिक न्यायालयाने अतुल यांना त्यांच्या अल्पवयीन मुलासाठी दरमहा 40,000 रुपये पालनपोषण भत्ता देण्याचे आदेश दिले होते. 

मीडिया रिपोर्ट्सनुसार, अतुल यांच्याकडे बंगळुरूमधील घराच्या भाड्यासह त्यांचा आणि त्यांच्या कुटुंबाचा खर्च भागवण्यासाठी दरमहा 44,000 रुपये शिल्लक होते. निकिता सिंघानिया यांचा पगारही चांगला असल्याचे वकिलाने सांगितले. आत्महत्येसारखे पाऊल उचलल्याबद्दल न्याय व्यवस्थेला दोष देता येणार नाही.हे संपूर्ण प्रकरण जुलै 2024 मधील आहे. जौनपूरच्या कौटुंबिक न्यायालयाने अतुल सुभाष याच्या मुलाला दरमहा 40,000 रुपये पोटगी देण्याचे आदेश दिले होते, असे वकील दिनेश मिश्रा यांनी सांगितले. 

पीटीआयच्या वृत्तानुसार, निकिता सिंघानियाच्या तक्रारीत असे म्हटले आहे की, "माझ्या पतीने दारू पिऊन मला मारहाण करण्यास सुरुवात केली आणि पती-पत्नीचे नाते जनावरांसारखे बनवले. तो मला धमकावत होता आणि माझा संपूर्ण पगार माझ्या खात्यातून त्याच्या खात्यात ट्रान्सफर करायचा." दरम्यान, लग्नानंतर तीन वर्षांनी म्हणजे 2022 मध्ये निकिता सिंघानिया यांनी अतुल सुभाष, त्यांचा भाऊ आणि त्यांच्या आई-वडिलांविरोधात हुंड्यासाठी छळ केल्याचा एफआयआर दाखल केला होता.

Web Title: Atul Subhash Suicide Case:what was salary of ai engineer atul subhash he give money to his wife nikita singhania

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.