अबब...एक लाखाचा टफपॅड स्मार्टफोन !

By Admin | Published: February 22, 2017 02:22 PM2017-02-22T14:22:13+5:302017-02-22T14:27:43+5:30

पॅनासॉनिक कंपनीने भारतात तीन टफपॅड लाँच केले आहेत. यामध्ये एक टॅबलेट आणि दोन स्मार्टफोन आहेत.

Aub ... Smartphone with a lacquer touchpad! | अबब...एक लाखाचा टफपॅड स्मार्टफोन !

अबब...एक लाखाचा टफपॅड स्मार्टफोन !

googlenewsNext
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 22 - पॅनासॉनिक कंपनीने भारतात तीन टफपॅड लाँच केले आहेत. यामध्ये एक टॅबलेट आणि दोन स्मार्टफोन आहेत.
पॅनासॉनिक टफपॅड एफझेड-F1 आणि टफपॅड एफझेड-N1 असा स्मार्टफोन असून त्यांची किंमत अनुक्रमे 99 हजार व 1 लाख 9 हजार रुपये इतकी आहे. तर, एफझेड-A2 या टॅबलेटची किंमत 1 लाख 20 हजार रुपये इतकी आहे. तसेच, या मूळ किंमती व्यतिरिक्त प्रत्येक डिव्हाईसवर जादाचा कर आकारण्यात येणार आहे. 
टफपॅड एफझेड-F1 आणि टफपॅड एफझेड-N1 या स्मार्टफोनचे फिचर जवळपास सारखेच असून टफपॅड एफझेड-F1 विंडोज 10 या ऑपरेटिंग सिस्टमवर चालतो. तर एफझेड-N1 हा स्मार्टफोन ऍण्ड्रॉईड लॉलीपॉप 5.1.1 या ऑपरेटिंग सिस्टमवर चालतो. 
याचबरोबर, या स्मार्ट फोनमध्ये 2.3 गीगाहर्टस्ची ऑक्टाकोर क्वॉलकॉम स्नॅपड्रगन  801ही चिपसेट बसविण्यात आली आहे, तर 2 जीबी रॅम आणि 16 जीबी इंटरनल मेमरी देण्यात आली आहे. या दोन्ही स्मार्ट फोनना 8 मेगापिक्सलचा मेन कॅमेरा आणि 5 मेगापिक्सलचा  फ्रण्ट कॅमेरा देण्यात आला आहे.
 

Web Title: Aub ... Smartphone with a lacquer touchpad!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.