पोलीस बंदोबस्तात ८०० क्विंटल भाजीपाल्याचा लिलाव

By admin | Published: July 21, 2016 10:23 PM2016-07-21T22:23:28+5:302016-07-21T22:23:28+5:30

जळगाव : कृषि उत्पन्न बाजार समितीमध्ये किरकोळ व्यापारी किंवा खरेदीदार आणि अडतदार यांच्यात सहा टक्के अडत आणि एक टक्का बाजार शुल्कावरून सुरू झालेला वाद गुरुवारी काहीशा शांत झाला. फळ व भाजीपाला मार्केट यार्डमध्ये पहाटे ५.३० वाजताच लिलाव सुरू झाले. कुठलाही वाद झाला नाही. लिलाव सुरळीत व्हावेत यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना, बाजार समितीचे पदाधिकारी व कर्मचारी आणि पोलीस बंदोबस्त तैनात होता.

Auction of 800 quintals of vegetables in police custody | पोलीस बंदोबस्तात ८०० क्विंटल भाजीपाल्याचा लिलाव

पोलीस बंदोबस्तात ८०० क्विंटल भाजीपाल्याचा लिलाव

Next
गाव : कृषि उत्पन्न बाजार समितीमध्ये किरकोळ व्यापारी किंवा खरेदीदार आणि अडतदार यांच्यात सहा टक्के अडत आणि एक टक्का बाजार शुल्कावरून सुरू झालेला वाद गुरुवारी काहीशा शांत झाला. फळ व भाजीपाला मार्केट यार्डमध्ये पहाटे ५.३० वाजताच लिलाव सुरू झाले. कुठलाही वाद झाला नाही. लिलाव सुरळीत व्हावेत यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना, बाजार समितीचे पदाधिकारी व कर्मचारी आणि पोलीस बंदोबस्त तैनात होता.
बाजार समितीने सलग तीन दिवस काही खरेदीदारांनी गोंधळ घातल्याने व भाजी खरेदीदार महिलांना इतर खरेदीदार महिलांकडून मारहाण झाल्याने औद्योगिक वसाहत पोलिसांनी एक दंगा नियंत्रण पथकाचे वाहन आणि चार कर्मचारी नियुक्त केले होते.
पहाटेच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सरचिटणीस ॲड.हर्षल चौधरी, संजय घुगे, संभाजी सोनवणे, बाजार समितीचे सभापती प्रकाश नारखेडे, उपसभापती कैलास चौधरी आणि बाजार समितीचे १० ते १२ कर्मचारी लिलाव सुरळीत व्हावेत यासाठी फळे व भाजीपाला मार्केट यार्डात पोहोचले. त्यापाठोपाठ पोलिसही आले.
सर्व प्रतिनिधींनी शेतकरी, अडतदार आणि किरकोळ व्यापारी किंवा खरेदीदार यांना काही तक्रार असेल तर ती सांगा, लागलीच ती सोडवू, लिलाव प्रक्रिया सुरळीत पार पडू द्या, असे आवाहन केले.
यानंतर लिलाव सुरू झाले. लिलाव प्रक्रिया सुरळीत होईपर्यंत म्हणजेच दीत ते दोन तास शेतकरी व बाजार समितीचे प्रतिनिधी फळे व भाजीपाला मार्केट यार्डात उपस्थित होते.

पक्की बिले बंधनकारक
किरकोळ व्यापारी किंवा खरेदीदारांना भाजीपाला खरेदीनंतर पक्की बिले देण्यात येत आहेत की नाही याची तपासणी बाजार समिती प्रशासनाने केली. तसेच माल विकल्यानंतर शेतकर्‍यांना पावती दिले जात आहे की नाही याची माहिती शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींनी घेतली. शेतकर्‍यांनी अडत देऊ नये, आपली लुबाडणूक होत असेल तर तक्रार करावी, असे आवाहन ॲड.हर्षल चौधरी, संजय घुगे आदींनी केले. गुरुवारी खरेदीदारांना अडतदारांनी पक्की बिले दिली. कुठलीही तक्रार आली नाही, अशी माहिती बाजार समिती प्रशासनाने दिली.

सहा टक्के अडत घेतली
अडतदारांनी भाजीपाला खरेदीदारांकडून सहा टक्के अडत आणि एक टक्का बाजार समिती शुल्क घेतले. त्याबाबतची बिलेही हातोहात देण्याची व्यवस्था केली होती.

रोज असणार पथक
फळे व भाजीपाला मार्केटमध्ये लिलाव सुरळीत पार पडावेत, शेतकर्‍यांच्या अडचणी सोडविल्या जाव्यात यासाठी पुढील काहीदिवसरोज१०कर्मचार्‍यांचेपथकनियुक्तकेेलेजाणारअसल्याचीमाहितीदेण्यातआली.

Web Title: Auction of 800 quintals of vegetables in police custody

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.