तीन वाळू गटांचा अखेर लिलाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2016 10:26 PM2016-03-11T22:26:39+5:302016-03-11T22:26:39+5:30
जळगाव : २५ टक्क्याने किंमत कमी केलेल्या वाळू गटांपैकी शेवटच्या संधीतही जिल्ह्यातील केवळ तीनच वाळू गटांना बोली मिळाल्याने त्यांचाच लिलाव झाला. उर्वरित १७ गटांचा लिलाव आता होणारच नसल्याने त्याचे काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
ज गाव : २५ टक्क्याने किंमत कमी केलेल्या वाळू गटांपैकी शेवटच्या संधीतही जिल्ह्यातील केवळ तीनच वाळू गटांना बोली मिळाल्याने त्यांचाच लिलाव झाला. उर्वरित १७ गटांचा लिलाव आता होणारच नसल्याने त्याचे काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे. जिल्ह्यातील २० वाळू गटांना मागणी नसल्याने विभागीय आयुक्तांच्या मंजूरीनंतर त्यांची किंमत २५ टक्क्याने कमी करण्यात आली होती. त्यानुसार या गटांची चौथ्यांदा निविदा काढण्यात आली. ठेका घेण्याची शेवटची संधी होती. त्यातही केवळ तीनच गटांचा लिलाव होऊ शकला. यामध्ये अमळनेर तालुक्यातील बोदर्डे (८६ लाख ५१ हजार), चोपडा तालुक्यातील खाचणे (३० लाख ५१ हजार) या गटांचा ठेका नंदुरबार येथील श्री साई गणेश बिल्डींग मटेरियल सप्लायर्स यांनी घेतला. तसेच पाचोरा तालुक्यातील बहुळा नदीवरील दूधखेडा (१३ लाख ८२ हजार ५००) गटाचा ठेका गुजरात अंबुजा एक्सपोर्ट लि. यांनी घेतला. त्या १७ गटांचे काय?या वाळू गटांची निविदा भरण्याची ही शेवटची संधी होती तरी १७ गटांचा लिलाव होऊ शकला नाही. या गटांची फेरनिविदा निघत नसेल तर त्यांचे काय? असा प्रश्न आता निर्माण होणार आहे. लिलाव झालाच नाही तर यामध्ये प्रशासनाचे मोठे नुकसान होणार असून या बाबत काय निर्णय होतो, याकडे आता लक्ष लागून आहे.