फक्त वीस हजारांसाठी पित्याने भर बाजारात मांडला मुलींचा लिलाव
By admin | Published: April 15, 2016 08:31 AM2016-04-15T08:31:47+5:302016-04-15T12:47:13+5:30
हैदराबादच्या महबूब नगरमध्ये आर्थिक तंगीने पिचलेल्या एका व्यक्तीने आपल्या पोटच्या दोन मुलींना भरबाजारात लिलावासाठी उभे केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
हैदराबाद, दि. १५ - गरीबी वेळ प्रसंगी माणसाला अत्यंत वाईटातील वाईट गोष्ट करायला भाग पाडते. हैदराबादच्या महबूब नगरमध्ये आर्थिक तंगीने पिचलेल्या एका व्यक्तीने आपल्या पोटच्या दोन मुलींना भरबाजारात लिलावासाठी उभे केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. फक्त वीस हजार रुपयांसाठी तो पोटच्या दोन मुलींची विक्री करायला निघाला होता.
एक मुलगी सहावर्षांची आणि दुसरी अवघ्या चार महिन्यांची आहे. आई कामावर गेलेली असताना या पित्याने मुलीला लिलावासाठी बाजारात आणून उभे केले होते. बिजनापल्ली मंडला येथील लट्टूपल्ली गावात रहाणारा मल्लेश आणि त्याची पत्नी नरसम्मा अत्यंत हलाखीत दिवस काढत आहेत. सातवर्षांपूर्वी दोघांचा विवाह झाला. या दांम्पत्याला दोन मुली असून, मोठया मुलीचे नाव गीतांजली आणि छोटीचे नाव भूलक्ष्मी आहे.
मल्लेश रस्त्यावरुन येणा-या जाणा-या प्रत्येकाला आपली मुलगी विकत घ्या म्हणून गळ घालत होता. पैशांसाठी तो इतका अधीर झाला होता की, पोलिस आल्याचेही त्याला कळले नाही. पोलिसांशीही तो लिलावाच्या रक्कमेची चर्चा करत होता. तिथून ये-जा करणा-यांपैकी एकाने पोलिसांना याची माहिती दिल्यानंतर पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मल्लेशला अटक करुन मुलींना शिशुविहारमध्ये पाठवले आहे.