सखींच्या अभिनयाने प्रेक्षक मंत्रमुग्ध
By admin | Published: August 26, 2015 11:32 PM2015-08-26T23:32:43+5:302015-08-26T23:32:43+5:30
सखींच्या अभिनयाने प्रेक्षक मंत्रमुग्ध
Next
स ींच्या अभिनयाने प्रेक्षक मंत्रमुग्धकाटोल येथे श्रावण सोहळा : भरगच्च कार्यक्रमांची मेजवानीनागपूर : लोकमत सखी मंच काटोल शाखेच्यावतीने चातुर्मास श्रावण सोहळ्याचे नुकतेच आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला सखींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला, शिवाय सखींच्या अभिनयाने प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले. विविध स्पर्धा व कार्यक्रमाने काटोलकरांसाठी भरगच्च मेजवानी ठरली.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. रजनी हजारे होत्या. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून नेहा जोशी, संगीता सूर्यवंशी, अश्विनी मेश्राम, अर्चना देशमुख, संध्या खानोरकर, वर्षा टावरी, नलिनी फटिंग यांची उपस्थिती होती. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. सोहळ्यातील विविध स्पर्धेचे परीक्षण नेहा जोशी, अश्विनी मेश्राम, संध्या खानोरकर यांनी केले. श्रावण सोहळ्यात एकूण १३ संचाद्वारे विविध सणांचे देखावे सादर करण्यात आले. यामध्ये स्नेहल खळतकर (धंतोली) यांचा गौरी गणपती संघाने प्रथम पुरस्कार पटकावला. कल्याणी देशमुख (पंचवटी) संघाचा मंगळागौरी द्वितीय तर अनिता नाईक (लक्ष्मीनगर फैलपुरा) यांचा आषाढी पौर्णिमा संघ तृतीयस्थानी राहिला. हरतालिका (पारडसिंगा) शुभांगी खरबडे, जन्माष्टमी (तारबाजार) राधा घोडे, नवरात्र (बसस्टेशन) विद्या कावळे, दिवाळी (धंतोली) नेहा चांडक यांच्या संघास प्रोत्साहनपर पुरस्कार देण्यात आले. याशिवाय नागपंचमी, पोळा, करवाचौथ, रक्षाबंधन, दसरा, कोजागिरी या ग्रुपला बक्षिसे देण्यात आली. सर्व बक्षिसांकरिता आयुषीताई देशमुख यांनी भरीव सहकार्य केले. तसेच संगीता सूर्यवंशी, भाविन खोना यांचेही मोलाचे सहकार्य मिळाले. कार्यक्रमात प्रदेश महिला काँग्रेसच्या उपाध्यक्षा डॉ. रजनी हजारे (बल्लारशा) यांच्यातर्फे राजीव गांधी अस्थिव्यंग विद्यालयातील रोशनी घोडे हिला तीनचाकी सायकल व सविता इवनाते हिला कुबड्या देण्यात आल्या. लकी ड्रॉच्या विजेत्या मंगला कुर्वे यांना पैठणी देऊन सन्मानित करण्यात आले. संचालन सोनाली घोडे, जया बोरकर यांनी केले तर आभार कविता काळे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जया देशमुख, छाया मुसळे, राधा घोडे, पूजा देशमुख तसेच सर्व सखी मंच सदस्यांनी सहकार्य केले. (प्रतिनिधी)