आॅगस्टा वेस्टलँड; कंपनी प्रमुखास शिक्षा

By admin | Published: April 8, 2016 11:24 PM2016-04-08T23:24:05+5:302016-04-09T03:01:16+5:30

भारताला विकण्यात आलेल्या १२ हेलिकॉप्टर्स व्यवहाराच्या बनावट नोंदी ठेवणे आणि भ्रष्टाचार प्रकरणात फिनमेक्कॅनिका या कंपनीचे माजी प्रमुख गियुसेप्पेए ओर्सी यांना मिलान येथील

Augusta Westland; Company major education | आॅगस्टा वेस्टलँड; कंपनी प्रमुखास शिक्षा

आॅगस्टा वेस्टलँड; कंपनी प्रमुखास शिक्षा

Next

मिलान/नवी दिल्ली : भारताला विकण्यात आलेल्या १२ हेलिकॉप्टर्स व्यवहाराच्या बनावट नोंदी ठेवणे आणि भ्रष्टाचार प्रकरणात फिनमेक्कॅनिका या कंपनीचे माजी प्रमुख गियुसेप्पेए ओर्सी यांना मिलान येथील न्यायालयाने साडेचार वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली. इटलीची ही कंपनी संरक्षण आणि हवाईसेवा क्षेत्रात मोठा दबदबा असलेली आहे.
अति अति महत्त्वाच्या व्यक्तींसाठी ३,६०० कोटी रुपयांचे हे १२ हेलिकॉप्टर्स विकण्यात आले होते. ओर्सी यांना अपील न्यायालयाने गुरुवारी साडेचार वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. २०१४ मध्ये आधीच्या न्यायालयाने फिनमेक्कानिकाची सहयोगी कंपनी (हेलिकॉप्टर) आॅगस्टा वेस्टलँडचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी ब्रुनो स्पॅग्नोलिनी यांच्या संदर्भात दिलेला निकाल रद्द करून त्यांनाही चार वर्षांचा तुरुंगवास सुनावला. भारत सरकारला विकण्यात आलेल्या या १२ हेलिकॉप्टर व्यवहारात झालेल्या भ्रष्टाचारात ओर्सी आणि स्पॅग्नोलिनी दोषी आढळले, असे वृत्त इटलीतून आले आहे.

Web Title: Augusta Westland; Company major education

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.