फक्त एक कप चहाने अनेकांचं आयुष्य वाचवलं; जाणून घ्या 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?
By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2020 08:22 AM2020-05-17T08:22:14+5:302020-05-17T09:05:31+5:30
एका ट्रकने प्रवासी मजुरांनी भरलेल्या डीसीएमला धडक दिल्याने भीषण अपघात झाला होता. या अपघातात 24 मजुरांचा मृत्यू झाला तर 15 जण जखमी झाले.
लखनऊ - उत्तर प्रदेशमधील औरैया जिल्ह्यात एका ट्रकने प्रवासी मजुरांनी भरलेल्या डीसीएमला धडक दिल्याने भीषण अपघात झाला होता. या अपघातात 24 मजुरांचा मृत्यू झाला तर 15 जण जखमी झाले. जखमींना उपचारासाठी तातडीने जिल्हा रुग्णालयात आणि सैफई पीजीआय येथे पाठविण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एका ट्रकने कामगारांना घेऊन जाणाऱ्या डीसीएमला धडक दिली, अपघातात 24 लोक ठार, तर 15 जण जखमी झाले. ट्रकने धडक दिली, तेव्हा डीसीएम रस्त्यावर उभा होता. मात्र फक्त एक कप चहामुळे अनेकांचा जीव वाचल्याची माहिती आता समोर आली आहे.
दिल्लीवरुन आलेला एक ट्रक ढाब्यावर उभा होता. या ट्रकमधील काही मजूर हे चहा पिण्यासाठी खाली उतरले होते तर काही मजूर ट्रकमध्येच बसले होते. याच दरम्यान भीषण अपघात झाला. या ट्रकमध्ये चुन्याच्या गोणी आणि काही मजूर होते. धडक देणारा ट्रक जागेवर पलटला आणि त्याखाली काही मजूर चिरडले गेले. यामध्येच त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती घटनास्थळी उपस्थित असणाऱ्यांनी दिली आहे. तसेच हा अपघात चहा पिण्यासाठी ढाब्यावर गेलेल्या मजुरांच्या डोळ्यासमोर घडला. चहामुळे त्याचं आयुष्य वाचल्याची माहिती मिळत आहे. तर काही मजुरांचा झोपेतच मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
The incident took place at around 3:30 am. 23 people have died and around 15-20 have suffered injuries. Most of them are Bihar, Jharkhand and West Bengal: Abhishek Singh, DM Auraiya pic.twitter.com/fLpnPTAYmD
— ANI UP (@ANINewsUP) May 16, 2020
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी औरैया येथे घडलेल्या दुर्दैवी घटनेची दखल घेतली आहे. या अपघातात प्राण गमावलेल्या कामगारांबद्दल त्यांनी दुःख व्यक्त केलं आहे. अतिरिक्त मुख्य सचिव गृह अवनीश कुमार अवस्थी यांनी ही माहिती दिली. मुख्यमंत्री योगी यांनी पीडितांना सर्वतोपरी दिलासा देण्याचे तसेच सर्व जखमींना योग्य उपचार देण्याचे निर्देश दिले आहेत. त्यांनी मंडलयुक्त कानपूर आणि आयजी कानपूर यांना तातडीने घटनास्थळी पोहोचण्यासाठी आणि त्यांच्या देखरेखीखाली मदतकार्य करण्याचे, अपघाताचे कारण तपासून माहिती देण्याची सूचना केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
चीनच्या कंपन्यांना खेचण्यासाठी भारताचा 'डाव'; 'या' 9 राज्यांत देणार वाव
पाकिस्तान घाबरला! POK मध्ये पेरले भूसुरुंग; आपत्कालीन निविदा केली जारी
धक्कादायक! IASच्या व्हॉट्सअॅप ग्रुपवर अधिकाऱ्याने आक्षेपार्ह फोटो केला पोस्ट; उडाली खळबळ
पृथ्वीराज चव्हाणांच्या 'त्या' विधानानंतर काशी विश्वनाथ मंदिराने घेतला मोठा निर्णय
CoronaVirus News : कोरोनाचा उद्रेक! जगभरात कोरोनाग्रस्तांची संख्या 46 लाखांवर; 3 लाख लोकांचा मृत्यू
CoronaVirus News : बापरे! स्मार्टफोनमुळे पसरू शकतो कोरोना; डॉक्टरांनी दिला थेट 'हा' इशारा
'अणुबॉम्ब टाकायला जातोय...'; नौदलाच्या पायलटने हटके अंदाजात मागितली लग्नासाठी सुट्टी, पत्र व्हायरल