शुभ वर्तमान : देशात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण खूप वाढले
By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2020 08:39 AM2020-06-11T08:39:51+5:302020-06-11T08:40:10+5:30
१ लाख ३५ हजारांवर रुग्णांनी केली कोरोनावर मात
नवी दिल्ली : कोरोनाचा संसर्ग सुरू झाल्यापासून देशात प्रथमच रुग्ण बरे होण्याच्या प्रमाणात खूप मोठी वाढ झाली आहे. आजघडीला जितके रुग्ण उपचार घेत आहेत, त्याहून अधिक जण बरे होऊन घरी परतले आहेत.
देशात कोरोना रुग्णांची संख्या २ लाख ७६ हजार असली तरी त्यापैकी तब्बल १ लाख ३५ हजार २०५ जण या आजारावर मात करून घरी परतले आहेत.
त्यामुळे १ लाख ३३ हजार ६३२ जणांवर उपचार सुरू आहेत, तसेच अमेरिका, रशिया, ब्राझील, स्पेन, इटली, फ्रान्स, ब्रिटन या देशांच्या तुलनेत भारताचा मृत्यूदरही खूप कमी म्हणजे २.८ टक्के इतकाच आहे. त्यामुळे देशात कोरोनाच्या बळींची संख्या ७,७४५ आहे. वरील सर्व देशांत २ ते २० हजार जण, तर अमेरिकेत १ लाख १४ हजारांहून अधिक रुग्ण मरण पावले आहेत.