भारताच्या नोटाबंदीच्या निर्णयातून ऑस्ट्रेलियाला मिळाली प्रेरणा
By admin | Published: January 3, 2017 12:51 PM2017-01-03T12:51:07+5:302017-01-03T12:53:29+5:30
भारताने 500 आणि 1 हजार रुपयांच्या मोठया नोटा चलनातून बाद केल्यानंतर ऑस्ट्रेलियामध्येही नोटाबंदीची चर्चा सुरु झाली आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 3 - भारताने 500 आणि 1 हजार रुपयांच्या मोठया नोटा चलनातून बाद केल्यानंतर ऑस्ट्रेलियामध्येही नोटाबंदीची चर्चा सुरु झाली आहे. भारताप्रमाणे ऑस्ट्रेलियानेही काळापैसा रोखण्यासाठी मोठी नोट चलनातून बाद करावी अशी मागणी काही जणांनी ऑस्ट्रेलियात केली आहे. त्यापार्श्वभूमीवर ऑस्ट्रेलियाच्या भारतातील उच्चायुक्त हरींदर सिद्धू यांनी इंडियन एक्सप्रेसशी बोलताना भारताच्या नोटाबंदीच्या निर्णयाचे कौतुक केले आहे.
नोटाबंदी नंतरच्या संपूर्ण प्रक्रियेची मला उत्सुक्ता असून माझे लक्ष आहे. नोटाबंदीचा निर्णय यशस्वी ठरला तर, भारतीय व्यवस्थेमध्ये मोठा बदल घडून येईल. सरकार ज्या पद्धतीने परिस्थितीचा सामना करत आहे त्याचे मला कौतुक वाटते. लोकांच्या ज्या प्रतिक्रिया, तक्रारी आहे त्याला सरकारने चांगला प्रतिसाद दिला आहे.
निर्णय कठिण, जटिल असला तरी सरकारने केलेल्या प्रयत्नांचे कौतुक वाटते असे हरींदर सिद्धू यांनी सांगितले. काळा पैसा रोखण्यासाठी प्रेरणा देणारे हे पाऊल आहे. ऑस्ट्रेलियामध्ये नुकतीच आम्ही काळया पैशाविरोधात टास्क फोर्सची स्थापना केली आहे असे त्यांनी सांगितले. भारताकडून शिकण्यासाठी आम्ही या सर्व प्रक्रियेवर बारीक लक्ष ठेऊन आहोत असे हरींदर सिद्धू यांनी सांगितले.