"योगी आदित्यनाथ आम्हाला देऊन टाका!" ...म्हणून आस्ट्रेलियाच्या खासदारानं केलं UPचं कौतुक
By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2021 10:48 AM2021-07-12T10:48:30+5:302021-07-12T10:50:53+5:30
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे आता जागतिक स्थरावर कौतुक होऊ लागले आहे. ऑस्ट्रेलियाचे खासदार क्रॅग केली ( Craig Kelly) यांनी आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर ट्विट करत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांचे कौतुक केले आहे.
लखनौ - कोरोना व्हायरस (Corona Virus) महामारीच्या (Pandemic) व्यवस्थापनासंदर्भात उत्तर प्रदेशचे (Uttar Pradesh) मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (CM Yogi Adityanath) यांचे आता जागतिक स्थरावर कौतुक होऊ लागले आहे. ऑस्ट्रेलियाचे (Australia) खासदार क्रॅग केली ( Craig Kelly) यांनी आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर ट्विट करत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांचे कौतुक केले आहे. कोरोना व्यवस्थापनासंदर्भात उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी उचललेले पाऊल ऑस्ट्रेलियाच्या खासदारांना एवढे भावले आहे, की त्यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांना ऑस्ट्रेलियाच्या मदतीसाठीच मागितले आहे.
क्रॅग यांनी 10 जुलैला यासंदर्भात केलेले ट्विट जबरदस्त व्हायरल होत आहे. उत्तर प्रदेशातील कोरोना व्हायरस व्यवस्थापनाचे मॉडेल क्रॅग यांना प्रचंड आवडले आहे. यानंतर त्यांनी सोशल मिडियावर योगी आदित्यनाथांचे कौतुक केले आहे. ट्विटमध्ये क्रॅग म्हणाले, "भारतातील राज्य उत्तर प्रदेश... असा एखादा मार्ग आहे का, की ते त्यांचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आपल्याला काही दिवसांसाठी देऊ शकतील. जेनेकरून ते आपल्याला आयव्हरमॅक्टिनच्या (औषध) तुटवड्यातून बाहेर काढू शकतील. ज्यामुळे आपल्या राज्यात नैराश्याची स्थिती निर्माण झाली आहे.'
The Indian state of Uttar Pradesh 👏🏼👏🏼👏🏼👏🏼
— Craig Kelly MP (@CraigKellyMP) July 10, 2021
Any chance they could loan us their Chief Minister Yogi Adityanath to release the Ivermectin sort out the mess our hopelessly incompetent State Premiers have created
 https://t.co/H6xUwUe8GU
"उत्तर प्रदेशमध्ये राक्षसराज, कोणत्या तोंडानं ते स्वत:ला योगी म्हणवतात? हा तर ढोंगीपणाचा कळस"
याशिवाय, क्रॅग यांनी एका ट्विटवर उत्तर दिले आहे, ज्यात उत्तर प्रदेशातील कोरोना आकडेवारीसंदर्भात काही आकडे सांगण्यात आले आहेत. जे चायमीने डाटा शेअर करताना लिहिले आहे, की गेल्या 30 दिवसांत भारतातील 17 टक्के लोकसंख्या असलेल्या उत्तर प्रदेशात 2.5 टक्के मृत्यू झाले आणि एक टक्क्यापेक्षाही कमी कोरोना केसेस समोर आल्या. महाराष्ट्रात भारतातील 9 टक्के लोकसंख्या आहे आणि 18 टक्के कोरोना केसेस होत्या आणि एकूण मृत्यूंपैकी पंन्नास टक्के आकडेही येथेच होते. महाराष्ट्र हे भारतातील फार्मा हब आहे आणि यूपी आयव्हरमॅक्टिनच्या वापरात चॅम्पिअन.
ऑस्ट्रेलियात अजूनही कोरोनाचा हाहाकार सुरूच आहे. गेल्या 24 तासांत तेथे 3 हजार कोरोना रुग्ण सापडले आहेत.