शरीरसुखाची मागणी करणाऱ्या अधिकाऱ्याने पीडितेलाच टाकलं कारागृहात

By admin | Published: June 24, 2017 08:31 AM2017-06-24T08:31:40+5:302017-06-24T08:31:40+5:30

पोलिसांनी आरोपीला पकडण्याऐवजी त्या पीडित महिलेवर फसवणुकीचा आरोप करून तिला कारागृहात टाकलं आहे.

The authorities demanded a bodybuilding prison in jail | शरीरसुखाची मागणी करणाऱ्या अधिकाऱ्याने पीडितेलाच टाकलं कारागृहात

शरीरसुखाची मागणी करणाऱ्या अधिकाऱ्याने पीडितेलाच टाकलं कारागृहात

Next

ऑनलाइन लोकमत

रामपूर, दि. 24- दोन दिवसांपूर्वी रामपूर गंज पोलीस स्टेशनमध्ये  बलात्काराचा आघात सहन करुन तक्रार नोंदवण्यासाठी गेलेल्या महिलेकडे पोलीस अधिका-यानेच शरीर सुखाची मागणी केल्याची धक्कादायक घटना घडली होती. पण या प्रकरणात पोलिसांनी आरोपीला पकडण्याऐवजी त्या पीडित महिलेवर फसवणुकीचा आरोप करून तिला कारागृहात टाकलं आहे.  शुक्रवारी रामपूर पोलिसांनी पीडित महिला आणि तिच्या प्रियकराला कारागृहात टाकलं. पीडित महिला तिच्या प्रियकरासह तपास अधिकाऱ्याला फसविण्यासाठी कारस्थानं करत होती. महिलेकडे असलेल्या सीडीमध्ये जो आवाज आहे तो तपास अधिकाऱ्याचा नसून त्या महिलेच्या प्रियकराचा आहे. असं पोलिसांचं म्हणणं आहे. 
 
रामपूरमध्ये घडलेल्या या संपूर्ण प्रकरणाचा तपास ज्या पोलीस स्टेशनमधील पोलीस अधिकारी करत आहेत त्याच पोलीस स्टेशनमध्ये महिलेने आरोप केलेला अधिकारीही तैनात आहे. रामपूर गंज स्टेशनचे अधिकारी रविंद्र प्रताप सिंह या प्रकरणाचा तपास करत आहेत. त्यांनी दोन दिवसातच या प्रकरणाचा तपास पूर्ण केला. इतकंच नाही, तर पीडित महिला आणि पोलीस अधिकारी या दोघांचं संभाषण असलेल्या सीडीची फॉरेन्सिक तपासणी करणं गरजेचं नसल्याचंही त्यांनी म्हंटलं. ज्या मोबाइलवरून दोघांचं संभाषण झालं तो मोबाइल जप्त केल्याचं तपास अधिकाऱ्याने सांगितलं आहे. ज्या मोबाइलवरून पीडित महिलेला फोन केला गेला होता तो फोन तिच्याच प्रियकराचा होता. असं पोलिसांनी सांगितलं आहे.  
 
मोकाट फिरणा-या बलात्का-यांना तात्काळ अटक करावी या मागणीसाठी 37 वर्षीय पीडित महिला पोलीस स्टेशनमध्ये गेली होती. काही महिन्यांपूर्वी पीडित महिलेवर दोघा आरोपींनी बलात्कार केला होता. आरोपी गावात मोकाट फिरत असल्याने आपल्या जीवाला धोका आहे. त्यामुळे तुम्ही आरोपींना तात्काळ अटक करा असे या महिलेने पोलीस अधिका-याला सांगितले. पण पोलीस अधिका-याने तक्रार नोंदवून घेण्याऐवजी उलट महिलेकडेच शरीरसुखाची मागणी केली.  जेव्हा या महिलेने पोलीस अधिका-याची मागणी धुडकावून लावली. तेव्हा तिला आणखी एक धक्का बसला. पोलीस उपनिरीक्षकाने तिच्यावरील बलात्कार प्रकरणी क्लोजर रिपोर्ट दाखल केला. काय करावे ते या महिलेला समजत नव्हते. कोण आपल्याला मदत करेल या विवंचनेत ती होती. त्यानंतर तिने पुन्हा पोलीस अधिका-यांशी संपर्क साधला. त्यावेळी तिने अधिका-याबरोबर झालेल्या सर्व संवादाचे रेकॉर्डींग केले. पुरावा हाती आल्यानंतर तिने पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन त्यांच्या कानावर हा सर्व प्रकार घातला. एसपींनी या प्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत. 
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 12 फेब्रुवारीच्या रात्री पीडित महिलेवर दोघा आरोपींनी सामूहिक बलात्कार केला होता. यातील एक आरोपी महिलेच्या परिचयाचा होता. महिला आपल्या एका नातेवाईकाच्या घरी गेली होती. तिथून ती रामपूरला परतत असताना ही घटना घडली. दोघा आरोपींनी तिला घरापर्यंत लिफ्ट दिली. जेव्हा महिला घरात एकटी असल्याचे समजले तेव्हा त्यांनी बंदुकीच्या धाक दाखवून  तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. त्यावेळीही पोलिसांनी तक्रार नोंदवून घ्यायला नकार दिला होता. जेव्हा महिला स्थानिक कोर्टात गेली तेव्हा पोलिसांनी तक्रार नोंदवून घेतली. 
 
जय प्रकाश सिंह या पोलीस अधिका-याची भेट घेऊन मी त्याच्याकडे आरोपींना अटक करण्याची मागणी केली. पण त्याने माझ्याकडेच शरीरसुखाची मागणी केली. त्याने माझ्या मोबाईलवर फोन केला व घरी मला एकटीला बोलावले. जेव्हा मी त्याची मागणी धुडकावून लावली तेव्हा प्रकरण बंद करण्यासाठी त्याने क्लोजर रिपोर्ट दाखल केला असे पीडित महिलेने सांगितलं. 

Web Title: The authorities demanded a bodybuilding prison in jail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.