स्वयंचलित ‘मॅनिक्विन’ ग्राहकांना करते सॅनिटाइझ

By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2020 05:59 AM2020-07-27T05:59:11+5:302020-07-27T05:59:21+5:30

कोरोनापासून बचावासाठी भन्नाट शक्कल

Automatic ‘mannequin’ sanitizes customers | स्वयंचलित ‘मॅनिक्विन’ ग्राहकांना करते सॅनिटाइझ

स्वयंचलित ‘मॅनिक्विन’ ग्राहकांना करते सॅनिटाइझ

googlenewsNext


चेन्नई : कोरोना संसर्गापासून लोकांना सुरक्षित ठेवण्यासाठी साडीच्या दुकानात भन्नाट शक्कल लढविण्यात आली आहे. साडीधारी युवतीच्या मॅनिक्विनचे रूप लाभलेला यंत्रमानव ग्राहकांचे स्वागत करतानाच त्यांना सॅनिडाइझ करत असल्याचा व्हिडीओ समाजमाध्यमांत झळकला असून तो लोकप्रिय ठरला आहे.
इंडियन फॉरेस्ट सर्व्हिसेसमधील (आयएफएस) अधिकारी सुधा रामन यांनी हा व्हिडीओ ट्विटरवर झळकविला आहे. तंत्रज्ञानाचा सुयोग्य वापर असे शीर्षक त्यांनी दिले आहे. ही स्वयंचलित मॅनिक्विन साडीच्या दुकानात आलेल्या ग्राहकांपर्यंत जाऊन त्यांना सॅनिटाइझ करते. उद्योगपती हर्ष गोएंका यांनीही हा व्हिडीओ ट्विटरवर झळकविला आहे. गोएंका यांनी म्हटले आहे की, ही मॅनिक्विन साड्यांसाठी मॉडेलिंगही करते आणि सॅनिटायझरही पुरविते. साडीधारी मॅनिक्विन रुपातील यंत्रमानवाच्या हातात सॅनिटायझरची बाटली आहे व दुसऱ्या हातात स्क्रिन आहे. ग्राहकांना ती स्क्रिनद्वारे शोधून काढते. बाटलीतले सॅनिटायझर त्यांच्या हातावर शिंपडते.


आणखी आविष्कार शक्य
सुधा रामन यांनी टिष्ट्वटर खात्यावर या व्हिडीओसोबत लिहिलेल्या पोस्टमध्ये म्हटले की, कोरोना साथीचे निर्मूलन झाल्यानंतर तंत्रज्ञानाचे आणखी आविष्कार दिसणार आहेत. कोरोनामुळे जगात जे बदल झाले आहेत, त्याच्या अनुरूप सुविधा देण्याकरिता नवीन तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येईल.

Web Title: Automatic ‘mannequin’ sanitizes customers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.