स्वराज यांचा औटघटकेचा व्हर्च्युअल राजीनामा
By admin | Published: July 23, 2015 02:22 AM2015-07-23T02:22:53+5:302015-07-23T02:22:53+5:30
आधीच सर्व बाजूंनी आरोपांनी घेरल्या गेलेल्या परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज आज नव्या मुद्द्यामुळे चर्चेत आल्या
टिष्ट्वटरवर शब्दांचा खेळ
नवी दिल्ली : आधीच सर्व बाजूंनी आरोपांनी घेरल्या गेलेल्या परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज आज नव्या मुद्द्यामुळे चर्चेत आल्या. त्यांच्या टिष्ट्वटर हँडलमधील माहितीमधून अचानक काही वेळ ‘परराष्ट्रमंत्री, भारत सरकार’ ही माहिती गायब झाली. माध्यमे आणि त्यांच्या फॉलोअर्सच्या लक्षात आल्यावर झालेल्या जोरदार चर्चा व शंकांनतर त्यांचे पद पुन्हा टिष्ट्वटरवर अवतरले.
सुषमा स्वराज यांच्या टिष्ट्वटर हँडलवरील ‘फॉरेन मिनिस्टर, गव्हर्नमेंट आॅफ इंडिया’ ही माहिती दिसेनाशी झाल्यावर त्यांनी राजीनामा दिला किंवा तसे संकेत दिले आहेत, अशी चर्चा सर्वत्र होऊ लागली. गेला महिनाभर सुषमा स्वराज यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधक करीत आहेत.
त्यातच संसदेच्या सुरू झालेल्या पावसाळी अधिवेशनामध्ये विरोधकांनी परराष्ट्रमंत्र्यांनी राजीनामा दिल्याशिवाय कामकाज सुरळीत चालू देणार नसल्याची ताठर भूमिका घेतली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर टिष्ट्वटरवरून स्वराज यांनी आपले पद काढून टाकल्यामुळे त्यांनी राजीनामा दिला, असा अर्थ काढला जाऊ लागला.