सहायक फौजदारावर केले तलवारीने वार

By admin | Published: April 13, 2016 12:23 AM2016-04-13T00:23:08+5:302016-04-13T00:23:08+5:30

आरोपी लूटमार करीत असताना त्याच वेळी घटनास्थळावर पोहोचलेले जामनेर पोलीस ठाण्यातील सहायक फौजदार अनिल जावरे यांच्यावर आरोपी किशोर व बाळूने तलवारीने वार केले होते. जावरेंना वाचवताना सहायक पोलीस निरीक्षक संतोष साबळे यांच्याही डाव्या हाताच्या मनगटाला दुखापत झाली होती. पोलीस शिपाई नीलेश चौधरी, विकास सोनवणे, राजेंद्र बागुल यांनाही जबर मारहाण आरोपींनी केली होती. याप्रकरणी संतोष साबळे यांच्या फिर्यादीवरून जामनेर पोलीस ठाण्यात वरील आरोपींविरुद्ध प्राणघातक हल्ला करणे, मारहाण करणे तसेच सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल झाला होता.

Auxiliary fighter killed by the sword | सहायक फौजदारावर केले तलवारीने वार

सहायक फौजदारावर केले तलवारीने वार

Next
ोपी लूटमार करीत असताना त्याच वेळी घटनास्थळावर पोहोचलेले जामनेर पोलीस ठाण्यातील सहायक फौजदार अनिल जावरे यांच्यावर आरोपी किशोर व बाळूने तलवारीने वार केले होते. जावरेंना वाचवताना सहायक पोलीस निरीक्षक संतोष साबळे यांच्याही डाव्या हाताच्या मनगटाला दुखापत झाली होती. पोलीस शिपाई नीलेश चौधरी, विकास सोनवणे, राजेंद्र बागुल यांनाही जबर मारहाण आरोपींनी केली होती. याप्रकरणी संतोष साबळे यांच्या फिर्यादीवरून जामनेर पोलीस ठाण्यात वरील आरोपींविरुद्ध प्राणघातक हल्ला करणे, मारहाण करणे तसेच सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल झाला होता.
१३ साक्षीदार तपासले
हा खटला जिल्हा व अपर सत्र न्यायाधीश ए.के. पटणी यांच्या न्यायालयात चालला. त्यात सरकार पक्षातर्फे एकूण १३ साक्षीदार तपासण्यात आले. सरकार पक्षाचे वकील ॲड.सुरेंद्र काबरा यांचा प्रभावी युक्तिवाद व परिस्थितीजन्य पुरावे ग्रा‘ धरत न्यायालयाने आरोपी किशोर व बाळूला भादंवि कलम ३०७, ३३३ सह कलम १४९ प्रमाणे १० वर्ष सक्तमजुरी व एक हजार रुपये दंड; दंड न भरल्यास एक महिना साधी कैद तसेच भादंवि कलम ३५३ सह १४९ प्रमाणे दोन वर्ष सक्तमजुरी व एक हजार रुपये दंड; दंड न भरल्यास एक महिना साधी कैद अशी शिक्षा सुनावली. दरम्यान, याच दोन्ही भावांना (सत्र खटला क्रमांक २७०/१३) न्यायालयाने २६ फेबु्रवारी २०१६ रोजी भादंवि कलम ३९५ प्रमाणे १० वर्ष सक्तमजुरी व भादंवि कलम ३९७ प्रमाणे ७ वर्ष सक्तमजुरीची शिक्षा सुनावली होती. कायद्यातील तरतुदीनुसार या दोन्ही शिक्षा आरोपींनी एकत्रितरीत्या भोगाव्यात, असे न्यायालयाने आदेशित केले. आरोपींकडून ॲड.हिंमत सूर्यवंशी व ॲड.नितीन नाईक यांनी कामकाज पाहिले.
यांची झाली मुक्तता
संशयाचा फायदा झाल्याने; समाधान मोरे, झेंडू मोरे, पंडित मोरे, गिरधर मोरे, जंगलू ठाकरे, भिमसिंग मोरे, अरुण गायकवाड, गौतम झाल्टे, दिलीप मोरे यांची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली.

Web Title: Auxiliary fighter killed by the sword

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.