हिमस्खलनात आर्मी पोस्ट उद्धवस्त, जवान बेपत्ता
By admin | Published: April 6, 2017 09:14 PM2017-04-06T21:14:52+5:302017-04-06T21:31:53+5:30
जम्मू-काश्मीरमधील बटालिक सेक्टरमध्ये हिमस्खलन झाल्यामुळे येथील लष्कराची एक चौकी बर्फाखाली दबली आहे. यामध्ये जवान अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
श्रीनगर, दि. 06 - जम्मू-काश्मीरमधील बटालिक सेक्टरमध्ये हिमस्खलन झाल्यामुळे येथील लष्कराची एक चौकी बर्फाखाली दबली आहे. यामध्ये जवान अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बटालिक सेक्टरमध्ये असलेल्या लष्कराच्या चौकीवर हिमकडे कोसळले. त्यामुळे चौकी बर्फाखाली सापडल्यामुळे उद्धवस्त झाली असून चौकीत तैनात असलेले जवान बर्फाखाली अडकले. बर्फाखाली अडकलेल्या या पाचपैकी दोन जवानांना सुखरुप बाहेर काढण्यात आहे. तर बाकीच्या जवानांचा शोध सुरु आहे.
दरम्यान, जम्मू-काश्मीरमधील काही भागात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. लष्कराच्या जवानांकडून काश्मीर घाटीच्या पांजीपोरामध्ये पुरात अडकलेल्या लोकांनी सुरक्षित स्थळी हलविण्याचे काम सुरु आहे. याचबरोबर मुसळधार पावसामुळे येथील झेलम नदीच्या पाण्याची पातळी वाढली असून हायअलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच, गेल्या तीन दिवसांपासून येथील शाळांना सुट्या देण्यात आल्या आहेत.
J&K: Snowfall triggers multiple avalanches burrying Army Post in Batalik Sector, 2 soldiers out of 5 rescued; rescue ops for 3 in progress
— ANI (@ANI_news) April 6, 2017
#UPDATE Water level in Jhelum river has reached flood declaration mark of 18 ft in Srinagar"s Ram Munshibagh.
— ANI (@ANI_news) April 6, 2017