हिमस्खलनात लष्कराची चौकी उद्धवस्त , 3 जवान शहीद
By admin | Published: April 7, 2017 08:46 AM2017-04-07T08:46:09+5:302017-04-07T10:13:10+5:30
जम्मू-काश्मीरच्या बटालिक सेक्टरमध्ये झालेल्या हिमस्खलनामुळे पाच जवान अडकल्याची गेल्याची माहिती समोर आली आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
श्रीनगर, दि. 7 - जम्मू-काश्मीरच्या बटालिक सेक्टरमध्ये झालेल्या हिमस्खलनामुळे पाच जवान अडकल्याची गेल्याची माहिती समोर आली आहे. यातीन तीन जवान शहीद झाले आहेत, दोन जणांना वाचवण्यात यश आले आहे.
काश्मीरमध्ये मोठ्या प्रमाणात हिमवृष्टी सुरू असल्यानं अनेक ठिकाणी हिमस्खलनाच्या घटना होत आहेत. यादरम्यान बटालिक सेक्टर येथील भारतीय लष्कराची चौकी हिमस्खलनात दबली गेली. यात एकूण पाच जवान अडकले गेले. यापैकी तीन शहीद झालेत. दोन जवानांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले आहे, अशी माहिती एका लष्करी जवानानं दिली आहे.
दरम्यान, जम्मू-काश्मीरमधील काही भागात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. काही ठिकाणी पूरसदृष्य परिस्थिती निर्माण झाली आहे. तर झेलम नदीच्या पाण्याची पातळीही वाढली आहे. यामुळे हाय अलर्ट घोषित करण्यात आला आहे. तसेच येथील शाळांना सुट्टी देण्यात आली आहे.
लष्कराच्या जवानांकडून काश्मीर घाटीच्या पांजीपोरामध्ये पुरात अडकलेल्या लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्याचे काम सुरु आहे.
#UPDATE: Two soldiers have succumbed to their injuries after multiple avalanches in Batalik Sector (J&K). pic.twitter.com/z4ZJ3B8td5
— ANI (@ANI_news) April 7, 2017
Another soldier loses his life taking death toll to 3 after multiple avalanches in Batalik Sector (J&K). Two rescued safely.
— ANI (@ANI_news) April 7, 2017