काश्मीरमध्ये लष्कराच्या तळावर हिमस्खलन, एका अधिकाऱ्याचा मृत्यू
By admin | Published: January 25, 2017 01:15 PM2017-01-25T13:15:31+5:302017-01-25T15:04:22+5:30
जम्मू आणि काश्मीरमधील सोनमर्ग येथील लष्करी तळावर हिमस्खलन होऊन झालेल्या दुर्घटनेत
Next
ऑनलाइन लोकमत
श्रीनगर, दि. 25 - जम्मू आणि काश्मीरमधील सोनमर्ग येथे लष्करी तळावर हिमस्खलन होऊन झालेल्या दुर्घटनेत एका अधिकाऱ्याचा मृत्यू झाला असून, दोन जवान बेपत्ता झाले आहेत. तर आठ जवानांना सुरक्षितरीत्या वाचवण्यात आले आहे. कडाक्याची थंडी आणि मोठ्या प्रमाणात झालेल्या बर्फवृष्टीमुळे हे हिमस्खलन झाले.
जम्मू-काश्मीरची राजधानी असलेल्या श्रीनगरपासून 80 किमी अंतरावर असलेल्या सोनमर्गमधील लष्करी तळावर ही दुर्घटना घडली आहे. गेल्या काही दिवसांपासून पडत असलेली कडाक्याची थंडी आणि हिमवृष्टीच्या पार्श्वभूमीवर हवामान विभागाकडून हिमस्खलनाचा इशारा देण्यात आला होता. दरम्यान, आज सोनमर्ग येथील लष्करी तळाजवळील पर्वतांवर जमलेला बर्फ थेट या तळावर कोसळल्याने एका लष्करी अधिकाऱ्यास प्राणांना मुकावे लागले. तसेच काही जवान बेपत्ता झाले. त्यापैकी आठ जवानांना वाचवण्यात यश मिळाले. दरम्यान, या हिमस्खलनात मृत्युमुखी पडलेल्या जवानांचा आकडा वाढण्याची भीती लष्कराने व्यक्त केली होती. गतवर्षी सियाचीनमध्ये हिमस्खलन होऊन झालेल्या दुर्घटनेत मद्रास रेजिमेंटच्या दहा जवानांचा मृत्यू झाला होता.
Sonamarg (J&K) avalanche: One army officer martyred, 8 army men safely rescued.
— ANI (@ANI_news) 25 January 2017
#UPDATE: Avalanche hits army camp in Sonamarg (J&K), body of a jawan recovered. Army sources say death toll could rise
— ANI (@ANI_news) 25 January 2017