हिमाचल प्रदेशमधील जलविद्युत प्रकल्पावर हिमस्खलन, तीन जणांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2024 17:01 IST2024-03-11T17:01:28+5:302024-03-11T17:01:44+5:30
Avalanche In Himachal Pradesh: हिमाचल प्रदेशमधील किन्नौर जिल्ह्यात मोठी दुर्घटना घडली आहे. येथील एका जलविद्युत प्रकल्पावर हिमनग तुटून कोसळल्याने झालेल्या अपघातात ३ जणांचा मृत्यू झाला आहे.

हिमाचल प्रदेशमधील जलविद्युत प्रकल्पावर हिमस्खलन, तीन जणांचा मृत्यू
हिमाचल प्रदेशमधील किन्नौर जिल्ह्यात मोठी दुर्घटना घडली आहे. येथील एका जलविद्युत प्रकल्पावर हिमनग तुटून कोसळल्याने झालेल्या अपघातात ३ जणांचा मृत्यू झाला आहे. तर लाहौल स्पीती येथील काजा येथे एका घरावर हिमनग कोसळल्याने ४ जण अडकून पडले होते. त्यांना वाचवण्यात यश आलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार किन्नौरमधील काफनू हायड्रोपॉवर प्रकल्पामध्ये ही घटना घडली आहे. हायड्रोपॉवर प्रकल्पावर हिमनग कोसळल्याने त्याच्याखाली पाच जण दबले गेले. त्यामधील तीन जणांचा मृत्यू झाला. किन्नौरच्या कटगाव पोलीस चौकीमधून मिळालेल्या माहितीनुसार या हिमनगाखाली ५ जण दबले गेले होते. त्यातील तीन जणांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर इतर दोघांना किरकोळ दुखापत झाली. मृतांची ओळख अद्याप पटू शकलेली नाही.
दुसरीकडे लाहौल स्पीतीमधील काजा येथे भीषण हिमवृष्टीनंतर एका घरावर रात्री दोन वाजता हिमनगाचा तुकडा कोसळला होता. त्यावेळी एक कुटुंब घरात झोपलं होतं. या सर्वांचे प्राण वाचवण्यात यश आलं आहे. त्यांच्यावर आता रुग्णालयात उपचार सुरू आहेत.