लडाखमध्ये हिमस्खलनामुळे तिघांचा मृत्यू; 7 जणांचा शोध सुरू
By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2019 10:45 AM2019-01-18T10:45:13+5:302019-01-18T14:02:31+5:30
वातावरणात सतत बदल होत असल्यानं बचावकार्यात अडथळे
श्रीनगर: जम्मू-काश्मीरच्यालडाखमध्ये मोठ्या प्रमाणात हिमस्खलन झालं आहे. अनेक वाहनांना याचा फटका बसला आहे. काही वाहनं बर्फाच्या खाली गेली आहेत. त्यामध्ये 10 जण अडकले होते. त्यातील तिघांचे मृतदेह हाती लागले असून 7 जणांचा शोध सुरू आहे. हिमस्खलन झाल्याची माहिती मिळताच भारतीय लष्कराचं पथक तातडीनं घटनास्थळी पोहोचलं. सध्या या ठिकाणी बचावकार्य सुरू आहे. वातावरणात सतत बदल होत असल्यानं लष्कराला अडचणींचा सामना करावा लागत आहे.
Jammu & Kashmir: 10 people trapped under snow after an avalanche occurred in Khardung La, Ladakh. Search operation underway. More details awaited. pic.twitter.com/etWuxJLo1f
— ANI (@ANI) January 18, 2019
लडाखसह संपूर्ण जम्मू-काश्मीरमध्ये सध्या हिमवादळानं धुमाकूळ घातला आहे. आज सकाळी 7 च्या सुमारास लडाखमधील खारदुंगलामध्ये रस्त्यावर बर्फाच्या डोंगराचा काही भाग कोसळला. याचा फटका पर्यटकांना बसला. खारदुंगला भागात जगातील सर्वात उंचीवर असणारा रस्ता आहे. या ठिकाणचं तापमान उमे 15 अंश सेल्सिअस आहे. या ठिकाणी बर्फाच्या डोंगराचा काही भास कोसळल्यानं काही पर्यटक अडकले आहेत. याशिवाय हिमवादळामुळेही काही जण अडकून पडले आहेत.