सिक्कीममधील त्सोमगो तलावाजवळ हिमस्खलन, ६ ठार, १५० हून अधिक अडकले

By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2023 03:51 PM2023-04-04T15:51:08+5:302023-04-04T15:54:29+5:30

पूर्व सिक्कीममधील त्सोमगो तलावाजवळ हिमस्खलन झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

avalanche near tsomgo lake in east sikkim | सिक्कीममधील त्सोमगो तलावाजवळ हिमस्खलन, ६ ठार, १५० हून अधिक अडकले

सिक्कीममधील त्सोमगो तलावाजवळ हिमस्खलन, ६ ठार, १५० हून अधिक अडकले

googlenewsNext

पूर्व सिक्कीममधील त्सोमगो तलावाजवळ हिमस्खलन झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये १५० हून अधिकजण अडकल्याची भीती आहे. यात ६ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. मदत आणि बचाव कार्य सुरू आहे. हे हिमस्खलन १७व्या मैलावर झाले आहे. हे एक प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे.

स्थानिक लोकांच्या दिलेल्या माहितीनुसार, येथे अचानक हिमस्खलन झाले. यानंतर १५० हून अधिकजण बर्फात अडकले आहेत. बर्फात अडकलेल्यांना बाहेर काढण्याचे काम सुरू आहे. हिमस्खलनामुळे २० जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे.

दूर ठेवायचे म्हणून युक्रेन युद्ध छेडले; रशियाच्या अण्वस्त्रांच्या गोदामापर्यंत नाटो पोहोचले

मृतांमध्ये ४ पुरुष, १ महिला आणि एका लहान मुलाचा समावेश आहे. हिमस्खलनानंतर जखमींना जवळच्या आर्मी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आ आले, तिथे ६ जणांचा मृत्यू झाल्याची डॉक्टरांनी माहिती दिली. हा अपघात दुपारी १२.२० वाजता झाला. 

सिक्कीम पोलीस, ट्रॅव्हल एजंट असोसिएशन ऑफ सिक्कीम, पर्यटन विभागाचे अधिकारी आणि वाहनांचे चालक बचाव कार्य करत आहेत. 'पर्यटकांना फक्त १३व्या मैलापर्यंत जाण्याची परवानगी आहे. पण पर्यटक जबरदस्तीने १५व्या मैलाच्या दिशेने जात आहेत. पंधराव्या मैलावर हा अपघात झाला असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

Web Title: avalanche near tsomgo lake in east sikkim

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.