लष्करी तुकडीवर हिमस्खलन; जवानाचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2023 08:17 AM2023-10-11T08:17:34+5:302023-10-11T08:18:10+5:30
दुर्घटनेनंतर लगेचच बचावकार्य सुरू करण्यात आले, ते अद्यापही सुरू आहे.
श्रीनगर : लडाखमधील माउंट कुनजवळ लष्कराची एक तुकडी हिमस्खलनाच्या तडाख्यात सापडली. यात एका जवानाचा मृत्यू झाला, तर तीन बेपत्ता आहेत.
लडाखमधील माउंट कुनजवळ हाय अल्टिट्यूड वॉरफेअर स्कूल (एचएडब्ल्यूएस) आणि लष्कराच्या आर्मी ॲडव्हेंचर विंगमधील सुमारे ४० लष्करी जवानांच्या तुकडीचे प्रशिक्षण सुरू होते. तेव्हा झालेल्या हिमस्खलनात अनेक जवान अडकले. दुर्घटनेनंतर लगेचच बचावकार्य सुरू करण्यात आले, ते अद्यापही सुरू आहे.
हिमस्खलन होण्याची कारणे
- हिमस्खलन हे पर्वतीय भागातील बर्फाचा थर घसरल्यास होते.
- त्यामागील प्रमुख कारण म्हणजे त्या भागात अधिक बर्फवृष्टी, हवामान बदल किंवा मानवी हस्तक्षेप तसेच भूकंप झाल्यास हिमस्खलन होण्याची शक्यता अधिक असते.
- हिमस्खलन होणाऱ्या भागात सुरक्षेसाठी विशेष पथकाची नियुक्ती केली जाते.