प्रचंड वायुप्रदूषणामुळे भारतीयांचे सरासरी वय होतेय दीड वर्षाने कमी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2018 06:04 AM2018-08-24T06:04:24+5:302018-08-24T06:57:29+5:30

वायुप्रदूषण आणि आयुर्मर्यादा डेटाचे एकत्र अध्ययन प्रथमच करण्यात आले आहे

The average age of Indians due to heavy air pollution is less than one and a half years | प्रचंड वायुप्रदूषणामुळे भारतीयांचे सरासरी वय होतेय दीड वर्षाने कमी

प्रचंड वायुप्रदूषणामुळे भारतीयांचे सरासरी वय होतेय दीड वर्षाने कमी

googlenewsNext

ह्यूस्टन : हवेतील प्रदूषणामुळे भारतीय नागरिकांचे सरासरी आयुष्य दीड वर्षाने कमी होत आहे, असे मत येथील शास्त्रज्ञांनी व्यक्त केले आहे. तथापि, शुद्ध हवेमुळे जगातील नागरिकांचे आयुष्यमान वाढू शकते, असेही त्यांनी आपल्या अध्ययनात म्हटले आहे.

वायुप्रदूषण आणि आयुर्मर्यादा डेटाचे एकत्र अध्ययन प्रथमच करण्यात आले आहे. अमेरिकेतील आॅस्टिनमध्ये टेक्सास विद्यापीठाच्या संशोधकांनी हवेतील २.५ मायक्रॉनपेक्षा छोट्या कणाच्या (पीएम) वायुप्रदूषणाचे अध्ययन केले. हे सूक्ष्म कण फुप्फुसात प्रवेश करू शकतात. यामुळे हृदयविकार, स्ट्रोक, श्वसनाचे विकार आणि कॅन्सर होण्याचा धोका असतो.

पीएम २.५ प्रदूषण वीज यंत्र, कार आणि ट्रकपासून होणारे प्रदूषण, आग, शेती आणि औद्योगिक उत्सर्जनातून होते. वैज्ञानिकांना असे दिसून आले की, प्रदूषित देशांमध्ये बांगलादेश १.८७ वर्ष, इजिप्तमध्ये १.८५, पाकिस्तान १.५६, सौदी अरब १.४८, नायजेरिया १.२८ आणि चीनमध्ये १.२५ वर्षांपर्यंत वय कमी होत आहे. या अध्ययनानुसार भारतीय व्यक्तीचे सरासरी वय १.५३ वर्षांनी कमी होत आहे.

...तर ८५ वयापर्यंत जगता येईल
पर्यावरण विज्ञान आणि तंत्रज्ञान पत्रिकेत प्रकाशित लेखात या अध्ययनाचे नेतृत्व करणाऱ्या यहोशू एपटे यांनी म्हटले आहे की, वायू प्रदूषणामुळे जगभरात वयोमान कमी होत आहे. आशियामध्ये वायू प्रदूषणामुळे होणाºया मृत्यूची जोखीम समाप्त झाली तर, सरासरी ६० वर्ष जगणारी व्यक्ती ८५ वर्षांपर्यत जगू शकेल.

Web Title: The average age of Indians due to heavy air pollution is less than one and a half years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.