विमान इंधन महागले; पेट्रोल, डिझेलचे दर दुसऱ्या दिवशी कायम
By ऑनलाइन लोकमत | Published: July 1, 2020 11:24 PM2020-07-01T23:24:05+5:302020-07-01T23:24:17+5:30
गेले तीन आठवडे सातत्याने वाढत असलेल्या पेट्रोल व डिझेलच्या दरांमध्ये सलग दुसºया दिवशी कोणताही फरक इंधन कंपन्यांकडून करण्यात आला नाही.
नवी दिल्ली : सलग दुसºया दिवशी देशातील पेट्रोल व डिझेलचे दर कायम ठेवण्यात आले आहेत. दरम्यान बुधवारी विमानाच्या इंधनामध्ये ७.५ टक्क्यांनी दरवाढ करण्यात आली.
इंधन कंपन्यांनी विमानाच्या इंधनामध्ये एका किलोलीटरला २९२२.९४ रुपयांनी वाढ केली आहे. ही वाढ ७.५ टक्के असून आता विमान इंधनासाठी एका किलोलीटरला ४१९९२.८१ रुपये मोजावे लागणार आहे. गेल्या महिनाभरात या इंधनाच्या दरात करण्यात आलेली ही तिसरी वाढ आहे.
गेले तीन आठवडे सातत्याने वाढत असलेल्या पेट्रोल व डिझेलच्या दरांमध्ये सलग दुसºया दिवशी कोणताही फरक इंधन कंपन्यांकडून करण्यात आला नाही. दिल्लीमध्ये डिझेल ८०.४३ रुपये प्रतिलिटर तर पेट्रोल ८०.५३ रुपये प्रतिलिटर अशा दराने विकले जात आहे.