1 लाख बोगस कंपन्यांना टाळं, 3 लाख कंपन्या रडावर - पंतप्रधान मोदींचा गौप्यस्फोट
By admin | Published: July 1, 2017 07:16 PM2017-07-01T19:16:25+5:302017-07-01T20:38:43+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी नवी दिल्लीतील "द इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाऊंटंट्स ऑफ इंडिया"च्या कार्यक्रमात पोहोचले आहेत.
Next
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 1 - देशभरात जीएसटी (GST)ची अंमलबजावणी झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी प्रथमच यासंदर्भात भाषण केले. नवी दिल्लीत द इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाऊंटंट्स ऑफ इंडियाच्या कार्यक्रमात बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, कोणताही देश मोठ्यातील मोठ्या संकटातून स्वतःला वाचवू शकतो. माझ्या आणि तुमच्या (CA) देशभक्तीत कोणतीही कमी नाही. परदेशातील काळा पैशाविरोधात केलेल्या कारवाईचा काय परिणाम होत आहे, याची माहिती स्विस बँकेतील ताज्या आकडेवारी मिळत आहे. स्विस बँकेतील भारतीयांचा पैसा 45 टक्क्यांनी कमी झाल्याचे यावेळी पंतप्रधान मोदींनी सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणातील मुद्दे
सीए समाजाचे आर्थिक डॉक्टर
जसे डॉक्टर शारीरिक स्वास्थ्याची काळजी घेतात, तसेच चार्टर्ड अकाऊंटंट्सवर समाजातील आर्थिक स्वास्थ्याची जबाबदारी आहे. डॉक्टरांना माहिती असते की तुम्ही आजारी पडलात त्यांचं उत्पन्न वाढेल तरीही तो तुम्हाला योग्य गोष्टी खाण्यास सांगतो. आपल्या देशाची अर्थव्यवस्था योग्य, निरोगी राहावी हे चार्टर्ड अकाऊंटंट्स पाहतात.
जगभरात भारतीय सीएंचा डंका
सीए अर्थशास्त्राचा मोठा स्तंभ आहे. जगभरात भारतातील चार्टर्ड अकाऊंटंट्सना त्यांच्या उत्कृष्ट आर्थिक कौशल्यासाठी ओळखले जाते. नवीन चार्टर्ड अकाऊंटन्सी करिक्युलम कोर्सचा प्रारंभ करण्याची संधी मला मिळाली. या नवीन कोर्समुळे या क्षेत्रात येणा-या लोकांचे आर्थिक कौशल्य आणखी मजबूत होण्यास मदत होईल, अशी मी अपेक्षा करतो.
नोटाबंदीत चार्टर्ड अकाऊंटंट्सची दिवाळी सुट्टी झाली रद्द
8 नोव्हेंबर 2016 हा दिवस चार्टर्ड अकाऊंटंट्सना अधिक करुन लक्षात आहे. नोटाबंदीचा निर्णय काळा पैसा आणि भ्रष्टाचाराविरोधात मोठं पाऊल होतं. मी असे ऐकले की 8 नोव्हेंबरनंतर चार्टर्ड अकाऊंटंट्सना जास्त काम करावं लागले. चार्टर्ड अकाऊंटंट्सना इतके काम करावे लागले की कदाचित संपूर्ण कारर्कीदीत एवढं काम करण्याची वेळ आली नसावी. मी असेही ऐकली आहे की CA दिवाळीची सुट्टी साजरी करण्यासाठी गेले होते, मात्र सुट्टी रद्द करुन सर्व कामावर परतले. असे म्हणतात की सीएंचं ऑफिस दिवसरात्र सुरू होते. आता मला माहिती नाही परत आल्यानंतर तुम्ही (सीए) काय काम केले? योग्य की अयोग्य काम केले? देशासाठी केले की क्लायंटसाठी केले? मात्र, केले एवढं नक्की.
देशात दोन पद्धतींचे स्वच्छता अभियान
2013 मध्ये स्विस बँकेत भारतीयांचा पैसा 42 टक्क्यांनी वाढला, आता तो 45 टक्क्यांनी कमी झालाय. परदेशात काळा पैसा जम करण्यांसाठी आणखी अवघड परिस्थिती निर्माण होणार आहे. तुमचे (सीए) असे क्लायंट नसतील, असा मला विश्वास आहे. तुमच्यावर मला विश्वास आहे, त्यांना तुम्ही कानात सांगा. देशात मी एकीकडे स्वच्छता अभियान आणि अर्थव्यवस्थेत सफाई अभियान चालवत आहे.
पंतप्रधान मोदींचा गौप्यस्फोट - 3 लाखाहून अधिक नोंदणीकृत कंपन्या चौकशीच्या फेऱ्यात
3 लाखांपेक्षा अधिक नोंदणीकृत कंपन्यांची देवाणघेवाण चौकशीच्या फेऱ्यात आल्या आहेत. हा आकडा आणखी किती वाढेल हे सांगू शकत नाही. जेव्हा चौकशी सुरू केली तेव्हा काही कंपन्यांची भूमिका गंभीर स्वरुपाची आढळली. एकीकडे सरकार, व्यापारी जग, मीडिया सर्वांचे लक्ष यावर होते की 30 जूनच्या रात्री आणि 1 जुलैच्या सकाळी काय होणार. मात्र 48 तासांपूर्वीच एक लाख बोगसकंपन्यांना टाळं ठोकण्यात आले.
नोटाबंदीनंतर 3 लाखांपेक्षा जास्त नोंदणीकृत कंपन्यांची देवाणघेवाण चौकशीच्या घेऱ्यात आल्या आहेत. नियम मोडणाऱ्या कंपन्यांवर येत्या काळात आणखी कठोर कारवाई करणार. तसंच कंपन्यांवरील कारवाईचा राजकारणात तोटा, पण कुणापासून तरी सुरुवात होणं गरजेचं आहे, असंही यावेळी पंतप्रधान मोदी म्हणालेत.
11 वर्षात केवळ 25 सीएंवरच कारवाई का?
गेल्या 11 वर्षात केवळ 25 सीएंविरोधात कारवाई झाली आहे. केवळ 25 जणांनी घोटाळा केला. मी असे ऐकले आहे की तुमच्याकडे 1400 हून अधिक प्रकरणं वर्षानुवर्षे अडकून पडली आहेत. एक-एक प्रकरणाचा निर्णय येण्यासाठी अनेक वर्ष लागतात. एवढ्या उच्च दर्जाच्या क्षेत्रासाठी हा चिंतेचा विषय नाही का ?, असा प्रश्नही यावेळी मोदींनी उपस्थित केला.
The CA community looks after the economic health of society: PM Narendra Modi pic.twitter.com/GLyeACJ3MV
— ANI (@ANI_news) July 1, 2017
Those who have looted the poor will have to give back what they have looted: PM Narendra Modi pic.twitter.com/wXYS7SrFeO
— ANI (@ANI_news) July 1, 2017
A country where a select few loot, such a nation cannot scale new heights. These select few never want the nation to grow: PM Modi pic.twitter.com/q2x748Kbqe
— ANI (@ANI_news) July 1, 2017