गोव्यात माध्यमप्रश्नी कटुता टाळा
By admin | Published: May 2, 2016 12:37 AM2016-05-02T00:37:10+5:302016-05-02T00:37:10+5:30
माध्यम प्रश्नावर संघ-भाजपा संघर्षातून होणाऱ्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी माध्यम प्रश्नी कटुता टाळा, हा प्रश्न शांततापूर्ण मार्गाने सोडविणे शक्य आहे
पणजी : माध्यम प्रश्नावर संघ-भाजपा संघर्षातून होणाऱ्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी माध्यम प्रश्नी कटुता टाळा, हा प्रश्न शांततापूर्ण मार्गाने सोडविणे शक्य आहे, असा सल्ला भारतीय भाषा सुरक्षा मंचला रविवारी दिला. चर्चा, वाटाघाटींनी शांततापूर्ण मार्गाने प्रश्न सोडविणे शक्य आहे. कटुता टाळली पाहिजे, असे त्यांनी येथील भगवान महावीर उद्यानात भगवान महावीर यांच्या पुतळ््याच्या अनावरणप्रसंगी सांगितले. पर्रीकर यांनी भाषा सुरक्षा मंचचा प्रत्यक्ष उल्लेख टाळला. गोव्यात राहणारी प्रत्येक व्यक्ती गोवेकर आहे. त्यांच्याशी दुजाभाव करू नका. गोव्यात राहणाऱ्या इतरांना शत्रू लेखू नका. पुण्यात तसेच अन्य ठिकाणीही लष्कर व नागरिक यांच्यातील मतभेद आपण मिटविलेले आहेत, असे त्यांनी सांगितले.