झोपण्याआधी या 8 गोष्टी करणं टाळा

By Admin | Published: August 2, 2016 05:12 PM2016-08-02T17:12:15+5:302016-08-02T17:14:20+5:30

चांगली झोप लागण्यासाठी काही आवश्यक गोष्टींची काळजी घेणं तितकंच गरजेचे आहे. उत्तम, शांत झोप हवी असेल तर या गोष्टी नक्की टाळा...

Avoid doing these 8 things before sleeping | झोपण्याआधी या 8 गोष्टी करणं टाळा

झोपण्याआधी या 8 गोष्टी करणं टाळा

googlenewsNext
>ऑनलाइन लोकमत - 
मुंबई, दि. 02 - दिवसभर काम करुन थकल्यानंतर रात्री निवांत झोप लागावी असं प्रत्येकालाच वाटत असतं. पण अनेकदा काहीजणांना हवी तशी झोप मिळत नाही. यामागची कारणं वेगवेगळी असू शकतात. मात्र अनेकदा नीट झोप न येण्यामागे आपणदेखील जबाबदार असतो. आपण केलेल्या चुकांमुळे नीट शांत झोप लागत नाही, आणि याचा परिणाम आपल्या संपुर्ण दिवसावर होतो. चांगली झोप लागण्यासाठी काही आवश्यक गोष्टींची काळजी घेणं तितकंच गरजेचे आहे. उत्तम, शांत झोप हवी असेल तर या गोष्टी नक्की टाळा...
 
 
 
1) झोपण्याआधी हलके अन्न खाणे चुकीचे आहे. असे केल्याने रात्री जास्त वेळा वॉशरुमला जावे लागते.ज्यामुळे नीट झोप मिळत नाही
 
2) जर तुम्ही झोपण्याआधी धुम्रपान केले तर चांगली झोप लागणार नाही
 
3) रात्री झोपण्याआधी ऑफिसच्या कामाविषयी जास्त विचार करु नका. ऑफिसच्या कामाचा विचार करत बसल्यास तणाव येतो आणि शांत झोप लागत नाही
 
4) झोपण्याआधी दारु पिऊ नका. शांत झोप लागणार नाहीच उलट सकाळी उठल्यावर हँगओव्हर होईल तो वेगळा
 
5) अनेकांना माहित नसेल पण कॉफीमुळेही झोप लागत नाही. संध्याकाळ नंतर कॉफी प्यायल्याने झोप उडू शकते
 
6) झोपण्याआधी गोड पदार्थ खाण्यापासुन दूर रहा
 
7) झोपण्याअगोदर स्पाइसी फूड खाणे टाळावे, असे केल्याने झोप चांगली येईल
 
8) रात्रभर टीव्ही पाहत बसलात तर सकाळी उठल्यावर फ्रेश वाटत नाही. त्यामुळे रात्री उशिरापर्यंत टीव्ही पाहणे टाळा
 

Web Title: Avoid doing these 8 things before sleeping

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.