‘सरकारी कार्यक्रमांमध्ये समई पेटविणे टाळावे’

By admin | Published: August 30, 2016 04:29 AM2016-08-30T04:29:26+5:302016-08-30T04:29:26+5:30

सरकारी आणि शाळांतील कार्यक्रमांत पारंपरिक दिवे पेटविणे आणि धार्मिक स्त्रोतांचे गायन करणे टाळले पाहिजे, असे मत केरळचे सार्वजनिक बांधकाम मंत्री जी. सुधाकरन यांनी व्यक्त केले.

'Avoid Getting Involved in Government Programs' | ‘सरकारी कार्यक्रमांमध्ये समई पेटविणे टाळावे’

‘सरकारी कार्यक्रमांमध्ये समई पेटविणे टाळावे’

Next

थिरूवनंतपूरम : सरकारी आणि शाळांतील कार्यक्रमांत पारंपरिक दिवे पेटविणे (समई प्रज्वलित करणे) आणि धार्मिक स्त्रोतांचे गायन करणे टाळले पाहिजे, असे मत केरळचे सार्वजनिक बांधकाम मंत्री जी. सुधाकरन यांनी व्यक्त केले.
सुधाकरन रविवारी सायंकाळी मुथुकुलम (जि. अलापुझ्झा) येथे नमुक्कु जथियिल्ला (आम्ही जातींच्या प्रेरणांचे नाहीत) या चर्चासत्राच्या उद््घाटन प्रसंगी बोलत होते. जी. सुधाकरन म्हणाले,‘‘आमच्या घटनेला कोणताही धर्म किंवा जात नाही. त्यामुळे सरकारी किंवा शाळांमधील कार्यक्रमांत पारंपरिक दिवे प्रज्वलित करण्याची गरज नाही.’’ धार्मिक स्त्रोतांचे गायन करण्याऐवजी सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये देशभक्तीची गीते म्हटली जाऊ शकतात, असेही त्यांनी सूचविले.

Web Title: 'Avoid Getting Involved in Government Programs'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.