पानिपत टाळण्यासाठी कुरुक्षेत्रावर
By admin | Published: January 19, 2017 01:52 PM2017-01-19T13:52:21+5:302017-01-19T14:18:40+5:30
प्रत्येक राजकीय पक्ष प्रचार करण्यात मश्गुल आहेत. काँग्रेस-सपाच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी हिंदू मतदारांना आकर्षित करण्यासाठी एक पोस्टर जारी केलं आहे
Next
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि 19 - काँग्रेस आणि समाजवादी पार्टीमध्ये आघाडी निश्चित झाल्यानंतर उत्तरप्रदेशमधील राजकीय समीकरणे बदलली आहेत. राज्यात निवडणूकीची रणधुमाळी चांगलीच रंगली आहेत. प्रत्येक राजकीय पक्ष प्रचार करण्यात मग्न आहेत. काँग्रेस-सपाच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी हिंदू मतदारांना आकर्षित करण्यासाठी पोस्टरबाजी सुरू केली आहे. एका पोस्टरमध्ये अखिलेश यादव यांना अर्जुनाच्या रूपात, तर राहुल गांधींना कृष्ण दाखवण्यात आले आहे. महाभारतात युद्धापूर्वी कृष्णांनी अर्जुनाला गीता सांगून उपदेश केला. तोच फोटो पोस्टरच्या स्वरूपात छापून अर्जुन व कृष्णाच्या जागी अखिलेश व अर्जुन यांचे चित्र लावण्यात आले आहे. आधुनिक कृष्ण-अर्जुनाची जोडी पानिपत टाळण्यासाठी कुरुक्षेत्रावर जाणार आहे, असेच जाणवते.
काँग्रेस-सपाने जारी केलेल्या अखिलेश-राहुल यांच्या या फोटोवरुन स्थानिक सपा नेते वादात अडकले आहेत. या फोटोद्वारे हिंदू लोकांच्या धार्मिक भावाना दुखवल्या जातील असे सांगत वाराणसीच्या जिल्हाधिकाऱ्याने सपा नेत्यांविरुद्ध आचार संहिता भंग केल्याचा खटला दाखल केला आहे.