एकदाच वापराच्या प्लास्टिकचा उपयोग टाळा - पंतप्रधान मोदी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2019 03:33 AM2019-09-12T03:33:06+5:302019-09-12T03:33:19+5:30
जनावरांचे लसीकरण : १२,६५२ कोटी रुपये खर्च करणार
मथुरा (उत्तर प्रदेश) : एकदाच वापरले जाईल अशा प्लास्टिकचा वापर लोकांनी टाळावा, असे आवाहन करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्लास्टिकच्या अनिर्बंध वापरामुळे पर्यावरणाला धोका निर्माण झाला असून, त्यातून जनावरांचा आणि माशांचा मृत्यू घडला आहे, असे
म्हटले.
‘स्वच्छता ही सेवा’ कार्यक्रमात बुधवारी येथे मोदी महिलांना कचऱ्यातून प्लास्टिक वेगळे काढण्यास मदत केल्यानंतर मार्गदर्शन करताना बोलत होते. कचºयातून प्लास्टिक वेगळे काढण्यासाठी मोदी हे महिलांसोबत जमिनीवर बसले होते. यातून एकदाच वापरात येणाºया प्लास्टिकचा वापर बंद करण्याच्या मोहिमेद्वारे परिणामकारक संदेश लोकांमध्ये गेला.
मोदी येथे एक दिवसाच्या दौºयावर आले असताना त्यांच्या हस्ते राष्ट्रीय प्राणी रोग नियंत्रण कार्यक्रमाचे उद््घाटन करण्यात आले. जनावरांना होणारे संसर्गजन्य आजार नष्ट करण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. २०२४ पर्यंत या कार्यक्रमासाठी केंद्र सरकार १०० टक्के निधी देणार आहे.
१२ हजार ६५२ कोटी रुपये खर्चाच्या या कार्यक्रमाद्वारे ५०० दशलक्ष जनावरांचे (गुरेढोरे, मेंढ्या, शेळ्या, डुकरे) लसीकरण केले जाणार आहे. दरवर्षी या कार्यक्रमाद्वारे ३६ दशलक्ष गोवंश मादी वासरांच्या लसीकरणाचे लक्ष्य ठरविण्यात आले आहे. ही जनावरे संसर्गजन्य आजारांनी त्रस्त असतात व हे आजार जनावरांकडून मानवाला होतात.
कचरावेचक २५ कामगारांशी संवाद
कार्यक्रमात २०२५ पर्यंत हे आजार नियंत्रणात ठेवण्याचे आणि २०३० पर्यंत त्यांना नष्ट करण्याचे टप्पे आहेत. या भेटीमध्ये मोदी यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. ‘स्वच्छता ही सेवा’ कार्यक्रमाचा भाग म्हणून मोदी २५ कचरावेचक कामगारांना भेटले.
महिलांनी तोंडावर मास्क लावलेले व हातमोजे घातलेले होते. घराघरांतून निर्माण होणारा कचरा आणि त्यात प्लास्टिकचे असणारे प्रमाण याबद्दल मोदी यांनी विचारलेल्या प्रश्नांना या कामगारांनी उत्तरे दिली.