मानधन देण्यास टाळाटाळ

By admin | Published: June 12, 2015 05:38 PM2015-06-12T17:38:04+5:302015-06-12T17:38:04+5:30

राहेर : या परिसरातील अनेक गावांतील निराधारांना संजय गांधी निराधार योजनेचे मानधन मिळाले नाही़ त्यामुळे संबंधितांवर उपासमारीची वेळ येत आहे़ तीन ते चार महिन्यापासून निराधार मानधनाची वाट पाहत आहेत़ अधिकारी व ऑपरेटर तारीख पे तारीख देत आहेत, अशा तक्रारी निराधारांनी केल्या़

Avoiding Monetization | मानधन देण्यास टाळाटाळ

मानधन देण्यास टाळाटाळ

Next
हेर : या परिसरातील अनेक गावांतील निराधारांना संजय गांधी निराधार योजनेचे मानधन मिळाले नाही़ त्यामुळे संबंधितांवर उपासमारीची वेळ येत आहे़ तीन ते चार महिन्यापासून निराधार मानधनाची वाट पाहत आहेत़ अधिकारी व ऑपरेटर तारीख पे तारीख देत आहेत, अशा तक्रारी निराधारांनी केल्या़

धावत्या रेल्वेतून पडून इसमाचा मृत्यू
किनवट : तिरुपतीहून आदिलाबादकडे जाणार्‍या कृष्णा एक्स्प्रेसमधून पडल्याने ४७ वर्षीय इसमाचा मृत्यू झाल्याची घटना ११ जून रोजी पहाटे किनवट-कोसाई रेल्वे स्टेशनदरम्यान शिवराम खेडा जंगलात घडली़
अब्दुल रहमान अब्दुल हसन असे मयत इसमाचे नाव आहे़ ते कृष्णा एक्स्प्रेसने आदिलाबादकडे जातांना रेल्वेचा दरवाजा उघडून तोंड धूत होते़ तोल जावून पडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला़ या प्रकरणी अब्दुल सुलेमान अब्दुल रहेमान यांनी दिलेल्या तक्रारीवरून आकस्मिक मृत्यूची नोंद किनवट पोलिस ठाण्यात झाली़

बसवेश्वर विद्यालयाचा ९७ टक्के निकाल
फुलवळ : येथील श्री बसवेश्वर विद्यालयाचा १०वीचा निकाल ९६़७७ टक्के लागला़ खडकमांजरी येथील मोहिनी मेकाले ही ८९़२० टक्के गुण घेवून शाळेत पहिली आली़ अत्यंत प्रतिकुल परिस्थितीत तिने हे यश मिळविले़ मिरा गोपीनाथ हिने ८८़४० टक्के गुण प्राप्त केले़ आईने मोठ्या कष्टाने तिला साथ दिली़ सचिन बसवंते याने ८८ टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक मिळविला़ संस्थेच्या पदाधिकार्‍यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले़

विवाहितेचा छळ
नांदेड : मुलबाळ होत नसल्याच्या कारणावरून विवाहितेचा छळ करणार्‍या आरोपींविरूद्ध इतवारा पोलिसांनी गुन्हा नोंदविला़
कल्पना दत्ता राठोड रा़चिखलीतांडा ता़किनवट असे फिर्यादीचे नाव आहे़ दुकान टाकण्यासाठी माहेराहून २ लाख रुपये घेवून ये, तुला मुलबाळ होत नाही असे म्हणून शिवीगाळ वमारहाण करून आरोपींनी छळ केल्याचे कल्पना यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले़ सपोउपनि गीते तपास करीत आहेत़

स्वस्त धान्य दुकानदाराविरूद्ध गुन्हा
शंकरनगर : येथून जवळच असलेल्या मौजे पाचपिंपळी येथील स्वस्त धान्य दुकानदाराविरूद्ध रामतीर्थ पोलिसांनी गुन्हा नोंदविला़
सदर स्वस्त धान्य दुकानदार ग्राहकांना धान्य वाटप करीत नाहीत़ दुकानात भावफलक, साठा फलक, धान्य वाटपाची तारीख व दिवस न लिहिणे, ग्राहकांच्या रजिस्टरमध्ये स‘ा न घेता खोटे अंगठे घेणे, रॉकेलची चढ्या भावात विक्री करणे आदी कारणांवरून शंकर शिराळे रा़पाचंपिंळी ता़बिलोली यांनी रामतीर्थ पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविली़ पोलिसांनी गुन्हा दाखलकेला़

Web Title: Avoiding Monetization

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.