भारतात अवतरणार तंत्रज्ञानाच्या मदतीने ‘आवाजी’ बँकिंगचे युग!

By admin | Published: April 7, 2015 04:00 AM2015-04-07T04:00:54+5:302015-04-07T04:00:54+5:30

खातेदाराची त्याच्या आवाजावरून ओळख पटवून त्याआधारे त्याला फोनवरून तोंडी सूचना देऊन बँकेचे व्यवहार करण्याची सोय उपलब्ध करून देणारे

'Awajhi' banking era with the help of technology in India! | भारतात अवतरणार तंत्रज्ञानाच्या मदतीने ‘आवाजी’ बँकिंगचे युग!

भारतात अवतरणार तंत्रज्ञानाच्या मदतीने ‘आवाजी’ बँकिंगचे युग!

Next

मुंबई: खातेदाराची त्याच्या आवाजावरून ओळख पटवून त्याआधारे त्याला फोनवरून तोंडी सूचना देऊन बँकेचे व्यवहार करण्याची सोय उपलब्ध करून देणारे अत्याधुनिक तंत्रज्ञान आयसीआयसीआय बँक येत्या काही आठवड्यांत कार्यान्वित करणार आहे. खातेदाराची ‘बायोमेट्रिक’ पद्धतीने ओळख पटविण्यासाठी ‘व्हॉईस रेकग्निशन टेक्नॉलॉजी’ वापरणारी आयसीआयसीआय ही देशातील पहिली व जगातील मोजक्या बँकांमधील बँक ठरणार आहे.
सध्या नेट बँकिंग किंवा फोन बँकिंगने व्यवहार करताना खातेदाराला आपली ओळख पटविण्यासाठी १६ आकडी खातेक्रमांक किंवा पिन नंबर घालावा लागतो. म्हणजे त्याला ही माहिती संगणक किंवा मोबाईलची बटणे दाबून एंटर करावी लागते. हे तंत्रज्ञान खातेदाराचा केवळ आवाजच ओळखू शकते असे नव्हे, तर त्या बोलणारा रागावलेला आहे, चिडलेला आहे, की घाईत आहे यातील फरकही करू शकत असल्याने त्यानुसार खातेदारास सेवा देणेही शक्य होऊ शकेल. येत्या काही आठवड्यांत खातेदाराने आयसीआयसीआय बँकेस फोन केल्यावर १० सेकंदात बँकेचे सर्व्हर त्याच्या खात्याचा तपशील शोधून काढू शकतील आणि बँकेच्या डेटाबेससोबत त्या आवाजाच्या नमुन्याची ताडणी करून खातेदाराची ओळख पटविली जाईल.
अ‍ॅपलचे ‘सिरी’ (र्र१्र) हे आवाज ओळखणारे सॉफ्टवेअर ज्या तंत्रज्ञानावर आधारित आहे. तेच तंत्रज्ञान खातेदाराच्या ‘व्हॉईस रेकग्निशन’साठी वापरणार आहे. आयसीआयसीआय बँकेचे कार्यकारी संचालक राजीव सभरवाल यांनी सांगितले की, या तंत्रज्ञानासाठी बोलणाऱ्याने ठराविक भाषेतच बोलण्याची किंवा ठराविक शब्दच उच्चारण्याची गरज नसल्याने ओळख पटविण्याचे काम सुलभपणे होईल. परिणामी सामान्यातील सामान्य व्यक्तीही बँकेचे व्यवहार करू शकेल.
ओळख पटविण्यासाठी बोटांचे ठसे किंवा डोळ्याच्या बाहुल्यांची छबी अशा बायोमेट्रिकच्या अन्य पद्धतींचा अवलंब करण्याचे ठरविले असते तर त्यासाठी स्कॅनरही बसवावे लागले असते; परंतु ‘व्हॉईस रेकग्निशन’साठी कोणत्याही फोनवरून बँकेच्या कॉल सेंटरला केलेला फोन पुरेसा आहे. खातेदारांच्या आवाजाचे नमुने व सर्व्हर हे दोन्ही कॉल सेंटरमध्येच असणार असल्याने ‘डेटा कनेक्टिव्हिटी’चीही अडचण येणार नाही. (विशेष प्रतिनिधी)

Web Title: 'Awajhi' banking era with the help of technology in India!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.