दिव्यांगांना बसविले तीन तास ताटकळत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 1, 2018 02:03 AM2018-02-01T02:03:09+5:302018-02-01T02:03:42+5:30
व्हीआयपी संस्कृतीच्या अट्टाहासी पायी मात्र दोन वर्षाच्या बालिकेपासून अनेक दिव्यांगांना तीन तास रिकम्यापोटी ताटकळत बसावे लागले. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह त्यांना व्हीलचेअर देतानाची छायाचित्र काढण्याच्या अट्टाहासापायी हे करण्यात आले.
चंदीगड : व्हीआयपी संस्कृतीच्या अट्टाहासी पायी मात्र दोन वर्षाच्या बालिकेपासून अनेक दिव्यांगांना तीन तास रिकम्यापोटी ताटकळत बसावे लागले. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह त्यांना व्हीलचेअर देतानाची छायाचित्र काढण्याच्या अट्टाहासापायी हे करण्यात आले.
राजनाथ सिंह यांच्या हस्ते ३०० खाटांच्या धर्मशाळेचे उद्घाटन व्हायचे होते. राजनाथ सिंह सकाळी ११ ऐवजी ११.३५ वाजता पोहोचले. दिव्यांग बालकांची भेट घेण्याआधी त्यांनी अन्य मान्यवरांसह वृक्षारोपण केले. तोवर या दिव्यांग बालक व्हीलचेअरवर बसून होते.
मंत्री जाईपर्यंत त्यांनाही हे ठिकाण सोडता आले नाही. बालकांसह दिव्यांग मुुले आणि लोक भूकेने व्याकूळ झाली होती. दोन वर्षाची मान्या तर रडत होती. तिला भूक लागली होती. सकाळी ९ वाजेपासून आम्ही आलो आहोत. इतक्या वेळ थांबावे लागेल, हे सांगितले असते, तर आम्ही खाण्यास काही आणले असते. माझी मुुलगी एवढी लहान आहे की, तिला व्हीलचेअरवर बसताही येत नाही. व्हीलचेअरचा तिला काय उपयोग? असे तिची आई म्हणाली.
महेश शर्मा यांच्या चार वर्षाच्या मुलाला व्हीलचेअरवर बसणे खूप कठीण जात होते. कसाबसा तो व्हीलचेअरमध्ये बसला; त्याचे वडीलही खूप अस्वस्थ झाले होते.
खाद्यपदार्थांची दुकाने बंदच
मंत्रीमहोदयांच्या भेटीमुळे या संस्थेबाहेरील खाद्यपदार्थ आणि फळांची दुकाने दुपारपर्यंत बंद ठेवण्यात आली होती. त्यामुळे अनेकांना पालकांना आपल्या दिव्यांग मुुलांसाठी खाद्यपदार्थ आणि फळेही घेता आली नाहीत. (वृत्तसंस्था)