‘पुरस्कार वापसी’ सुरूच
By admin | Published: October 18, 2015 10:24 PM2015-10-18T22:24:03+5:302015-10-18T22:24:03+5:30
आपले पुरस्कार शासनाला परत करणाऱ्या साहित्य अकादमी पुरस्कार विजेत्यांविरुद्ध विविध केंद्रीय मंत्र्यांनी केलेल्या ‘बेजबाबदार’ वक्तव्याचा निषेध नोंदवीत प्रख्यात लेखक
वाराणसी : आपले पुरस्कार शासनाला परत करणाऱ्या साहित्य अकादमी पुरस्कार विजेत्यांविरुद्ध विविध केंद्रीय मंत्र्यांनी केलेल्या ‘बेजबाबदार’ वक्तव्याचा निषेध नोंदवीत प्रख्यात लेखक काशीनाथ सिंग यांनी आपले पुरस्कार परत करण्याची घोषणा रविवारी केली. त्यांच्या पाठोपाठ तेलगू भाषांतरकार कात्यायनी विदमाहे यांनीही आपला केंद्रीय साहित्य अकादमी भाषांतर पुरस्कार परत करण्याची घोषणा केली.
आपल्याला २०११ मध्ये आपल्या ‘रेहान पर रघू’ या लघुकथेसाठी मिळालेला साहित्य अकादमी पुरस्कार आणि धनादेश आपण सोमवारी अकादमीला परत करणार आहोत, असे सिंग यांनी म्हटले आहे. ‘आपापले पुरस्कार परत करणाऱ्या लेखकांविरुद्ध काही केंद्रीय मंत्र्यांनी अतिशय बेजबाबदार असे वक्तव्य केले आहे. या लेखकांचा निर्णय गंभीरपणे घेण्यात आलेला नाही. लेखक हे राजकीय हेतूने प्रेरित आहेत, या हास्यास्पद आरोपाचा निषेध नोंदवीत मी हा पुरस्कार परत करणार आहे,’ असे ते म्हणाले. बनारस हिंदू विद्यापीठाचे माजी प्राध्यापक असलेले सिंग हे आपल्या लघुकथा व कादंबरीसाठी ओळखले जातात. ते म्हणाले, लेखक राजकीय हेतूने प्रेरित आहेत असे म्हणणे हास्यास्पद आहे. लेखक हे कुणाच्या तालावर नाचतील एवढे मूर्ख नाहीत. महाराष्ट्र, कर्नाटक आणि दादरी येथे घडलेल्या दुर्दैवी घटनांवर अकादमीने घेतलेल्या भूमिकेच्या विरोधात या लेखकांनी ही कृती केली