कौटुंबिक हिंसाचार कायद्याची जाणीव- जागृती कार्यशाळा
By admin | Published: March 29, 2016 12:24 AM2016-03-29T00:24:37+5:302016-03-29T00:24:37+5:30
जळगाव- जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालयामार्फत कौटुंबिक हिंसाचारापासून संरक्षण अधिनियम २००५ व नियम २००६ अंतर्गत सदर कायद्याचा प्रचार व प्रसिद्धीसाठी एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन अल्पबचत भवन येथे सोमवारी करण्यात आले.
Next
ज गाव- जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालयामार्फत कौटुंबिक हिंसाचारापासून संरक्षण अधिनियम २००५ व नियम २००६ अंतर्गत सदर कायद्याचा प्रचार व प्रसिद्धीसाठी एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन अल्पबचत भवन येथे सोमवारी करण्यात आले.अध्यक्षस्थानी गटविकास अधिकारी डॉ.सोनिया नाकाडे व प्रमुख पाहुणे म्हणून समाजकार्य महाविद्यालयाचे प्रा.डॉ.वाय.जी.महाजन, प्रा.डॉ.नितीन बडगुजर तसेच मार्गदर्शक व व्याख्याते म्हणून ॲड.राजेंद्र वंजारी, सुधा गिंधेवार, बालविकास प्रकल्प अधिकारी व आशादीप महिला वसतिगृहाच्या अधिक्षिका, प्रियंका तारु हे उपस्थित होते. कार्यक्रमात गटविकास अधिकारी यांनी महिलांच्या सक्षमीकरणावर भर देऊन कायद्याचा सुयोग्य वापर करण्यासाठी आपली ग्रामपातळीवरील भूमिका महत्वाची असल्याचे व त्यासाठी योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन उपस्थितांना करण्यात आले. ॲड.राजेंद्र वंजारी यांनी कौटुंबिक हिंसाचार अधिनियमातील तरतुदींचा उहापोह करून जाणीव जागृती करून प्रत्येकाने संवेदनशील होणे तसेच कायद्यातील संरक्षण अधिकार्यांची महत्त्व पूर्ण भूमिका इ.वर सविस्तर मार्गदर्शन केे. समाजकार्य महाविद्यालयाचे प्रा.डॉ.वाय.जी.महाजन यांनी समाजातील एकत्र कुटुंब पद्धतीच्या र्हास होत असल्यामुळे सुसंवादा अभावी सामाजिक स्थिती विस्कळीत झाल्याचे प्रतिपादन केले. प्रमुख मार्गदर्शक प्रा.नितीन बडगुजर यांनी तळागाळतील महिलांपर्यंत अंगणवाडी सेविकांची महत्त्वपूर्ण भूमिका असल्याचे सांगून कायद्याबाबत जनजागृती करण्यावर अधिक भर देण्याबाबत आवाहन केले. प्रकाश राठोड, अध्यक्ष उडान बहु.संस्था यांनीदेखील मार्गदर्शन केले. प्रास्ताविक बालविकास प्रकल्प अधिकारी सुधा गिंधेवार यांनी केले. आभार तालुकास्तरीय संरक्षण अधिकारी महेंद्र बेलदार यांनी केले. सूत्रसंचालन भूषण लाडवंजारी यांनी केले. कार्यक्रमाचे आयोजन तुळजाई बहुउद्देशीय संस्थेचे भूषण लाडवंजारी यांनी तसेच कार्यालयातील सर्व अधिकारी, कर्मचारी, संस्थांचे अधीक्षक व कर्मचारी यांनी सहकार्य केले. सदर कार्यशाळेत अंगणवाडी सेविका, मुख्यसेविका, तालुकास्तरीय सर्व संरक्षण अधिकारी, समुपदेशक सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.