जबरदस्त! दहावी पास शेतकरी टोमॅटो विकून झाला कोट्यधीश
By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2023 08:28 AM2023-07-24T08:28:58+5:302023-07-24T08:29:10+5:30
: गेल्या काही आठवड्यांपासून टोमॅटोचे वाढलेले दर शेतकऱ्यांना श्रीमंत करत आहेत.
हैदराबाद : गेल्या काही आठवड्यांपासून टोमॅटोचे वाढलेले दर शेतकऱ्यांना श्रीमंत करत आहेत. तेलंगणातील बी. महिपाल रेड्डी नावाचे शेतकरी टोमॅटो विक्रीतून कोट्यधीश झाले आहेत. त्यांनी सुमारे ८ हजार क्रेट टोमॅटो विकून १.८ कोटी रुपये कमावले आहेत. चालू हंगामाच्या अखेरपर्यंत टोमॅटो विक्रीतून सुमारे २.५ कोटी रुपये कमावण्याचा त्यांचा अंदाज आहे.
रेड्डी हे मेडक जिल्ह्यातील कौडिपल्ली गावात शेती करतात. त्यांनी दहावीपर्यंतच शिक्षण घेतले. शाळा सोडून त्यांनी शेतीकडे लक्ष दिले. ते नेहमी धानाचे उत्पादन घेतात. फार नफा होत नसल्यामुळे त्यांनी यंदा टोमॅटोची शेती केली. एप्रिल महिन्यात त्यांनी ८ एकर शेतीवर टोमॅटोची लागवड केली होती.