अजब ! बायकोला बुडताना वाचवलं म्हणून पती भडकला
By Admin | Published: October 28, 2016 10:03 AM2016-10-28T10:03:59+5:302016-10-28T10:20:48+5:30
आपली पत्नी बुडताना वाचली हे पाहून खूश होण्याऐवजी तिच्या पतीचा पाराच चढला.
ऑनलाइन लोकमत
अहमदाबाद, दि. 28 - साबरमती येथे नदीमध्ये बुडणा-या एका विवाहित महिलेला वाचवण्यात आले. मात्र, आपली पत्नी वाचली हे पाहून खूश होण्याऐवजी तिच्या पतीचा पाराच चढला. एवढंच नाही तर पत्नीला वाचवणा-या व्यक्तीला त्याच्या रागाचा आणि धमकीचा सामनादेखील करावा लागला. पत्नीला वाचवले म्हणून आभार मानण्याऐवजी हा व्यक्ती असा का वागत आहे?, असे कोडे त्या कर्मचा-याला पडले.
साबरमती रिवरफ्रंटजवळ फायर अँड इमर्जन्सी सर्विसेसच्या (AFES) कर्मचा-याने या विवाहित महिलेला आत्महत्या करण्यापासून वाचवले. भारत मंगेला असे या कर्मचा-याचे नाव असून तो साबरमती रिवरफ्रंट येथे सेवेसाठी तैनात होता. ऑन ड्युटी असताना महिलेला डुबताना पाहून त्याने तिला वाचवले. मात्र यानंतर महिलेचा पती रागात आणि तावातावाने विचारू लागला की 'कुणाच्या परवानगीने त्याच्या पत्नीला आत्महत्या करण्यापासून वाचवले?', असे मंगेला यांनी सांगितले. यावेळी त्याने आमचा फोटोही काढला आणि त्यावरुन धमकी देऊ लागला. हे प्रकरण अजबच वाटल्याने त्याने झाल्या प्रकाराची माहिती पोलिसांना दिली.
वल्लभ सदनमागे 37 वर्षांच्या महिलेने नदीमध्ये उडी मारली. यानंतर फायर अँड इमर्जन्सी सर्विसेसची टीम (AFES) या महिलेला वाचवण्यासाठी पोहोचली आणि तिला सुखरुप वाचवलेदेखील. कर्मचा-यांनी याची माहिती तिच्या पतीला दिली. यावेळी तो घटनास्थळी धावत-धावत तर मात्र कर्मचा-यांवर आरडाओरडा करू लागला. मंगेला यांनी सांगितल्यानुसार, ' माझ्या पत्नीला का वाचवले', असे उलट प्रश्नच महिलेच्या पती केला. त्याची ही प्रतिक्रिया आश्चर्यचकीत करणार होती.
अशा वेळी धन्यवाद मानून आभार व्यक्त केले जातात, मात्र हा व्यक्ती तर धमकी देऊ लागला'. यानंतर हे प्रकरण रिवरफ्रंट पोलीस स्टेशनमध्ये पोहोचले, जिथे AFES कर्मचारी, महिला आणि तिच्या पतीचा जबाब नोंदवण्यात आला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 'आत्महत्येचा प्रयत्न करणा-या महिलेचे तिच्या पतीसोबत 10 वर्षांपूर्वी लग्न झाले होते. त्यांना दोन मुलेदेखील आहेत. मात्र सततच्या होणा-या भांडणांमुळे कंटाळल्याचे महिलेने सांगितले.
या दोघांनाही एकमेकांचे बाहेर दुस-या व्यक्तीसोबत संबंध असल्याच्या संशयावरुन वाद- भांडण होत होती. पोलिसांनी
यावेळी आपापसातील भांडण मिटवण्याची समज देऊन दोघांनाही घरी सोडून दिले.