जबरदस्त! हेलिकॉप्टमधून जाताना मुख्यमंत्र्यांनी पाहिला असा नजारा; व्हिडिओही शेअर केला, पाहा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 5, 2022 04:37 PM2022-12-05T16:37:56+5:302022-12-05T16:40:04+5:30
कॉनराड संगमा यांनी जयंतिया हिल्समधील एका सुंदर धबधब्याचा व्हिडिओ शेअर केला आहे.
नवी दिल्ली- हिरवीगार झाडं, निर्मळ नद्या, उंच टेकड्या, सुंदर धबधबे, तलाव आणि जंगल...मेघालय राज्य निसर्गप्रेमींसाठी स्वर्गापेक्षा कमी नाही. राज्याचे सौंदर्य पाहण्यासाठी लोक लांबून येतात. येथील छायाचित्रे आणि व्हिडिओ अनेकदा इंटरनेटवर व्हायरल होतात. याचदरम्यान मेघालयचे मुख्यमंत्री कॉनराड संगमा यांनी इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे.
कॉनराड संगमा यांनी जयंतिया हिल्समधील एका सुंदर धबधब्याचा व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. तसेच अनेकांना हा व्हिडिओ भुरळ देखील पाडत आहे. सदर व्हिडिओ शेअर करत संगमा म्हणाले की, जयंतिया हिल्सवरुन जात होतो. हा कोणता धबधबा आहे काही कल्पना?.. ही क्लिप आजूबाजूला झाडे-झाडांनी झाकलेल्या टेकड्यांमधून वाहणाऱ्या धबधब्याचे एक हवाई दृश्य आहे, जे पाहून लोक आश्चर्यचकित झाले. बहुतेक वापरकर्त्यांना ठिकाण शोधता आले नाही, परंतु काही लोकांनी कमेंट बॉक्समध्ये धबधब्याचे नाव लिहिले. नंतर त्यांच्या पोस्टला उत्तर देताना संगमा यांनी धबधब्याचं नाव उघड केलं.
लोकांनी प्रश्न विचारले-
मुख्यमंत्र्यांनी लिहिले, 'होय ते फि-फी फॉल आहे. ज्यांनी अचूक उत्तर दिले त्यांचे अभिनंदन. संगमा यांनी कालच हा व्हिडिओ शेअर केला असून आतापर्यंत या व्हिडिओला ८ हजारांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. व्हिडिओतील दृश्याने युजर्संना आश्चर्यचकित केले. व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या. एका युजर्सने लिहिले की, 'वाह खूप सुंदर जागा. खूप छान सर. दुसर्या युजरने कमेंट केली, 'व्वा किती सुंदर धबधबा, किती प्रेक्षणीय दृष्य आहे.' तिसर्याने लिहिलं, 'फि फाई फॉल... दोनदा तिथे गेलो आणि इथे खूप आवडलं. मेघालय हे खरोखरच देवाने निवडलेले ठिकाण आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"