एके काळचा आयआयटी प्रोफेसर देतोय आदिवासींना आयुष्याचे धडे

By admin | Published: May 19, 2016 04:24 AM2016-05-19T04:24:57+5:302016-05-19T04:24:57+5:30

जगभरातील महत्त्वपूर्ण उच्च पदव्या झोळीत असलेले आलोक सागर कधी काळी आयआयटी दिल्ली येथे प्रोफेसर राहिले आहेत,

Ayesha lessons of tribal people giving one time IIT professor | एके काळचा आयआयटी प्रोफेसर देतोय आदिवासींना आयुष्याचे धडे

एके काळचा आयआयटी प्रोफेसर देतोय आदिवासींना आयुष्याचे धडे

Next

अनिलसिंग ठाकूर- बैतुल- मानव संसाधन विकासमंत्री स्मृती इराणी यांची तर अगदी अलीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पदवी बनावट असल्याच्या आरोपांवरून वाद उफाळला असताना, आलोक सागर यांचे नाव वेगळ्या कारणाने समोर आले आहे.
देश आणि जगभरातील महत्त्वपूर्ण उच्च पदव्या झोळीत असलेले आलोक सागर कधी काळी आयआयटी दिल्ली येथे प्रोफेसर राहिले आहेत, हे बैतुलच्या आदिवासी भागात तुम्ही गेलात आणि त्यांच्याकडे बघितले, तर विश्वासच बसणार नाही. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजनसुद्धा त्या काळी दिल्ली विद्यापीठात शिकत होते.
आलोक सागर गेल्या २५ वर्षांपेक्षा जास्त काळापासून मध्य प्रदेशच्या घोडाडोंगरी विधानसभा मतदारसंघात येणाऱ्या शाहपूर ब्लॉकमधील कोचामाऊ गावी
एका आदिवासीप्रमाणे जीवन जगत आहेत.
तेथील गावकरी आणि परिसरातील लोक त्यांना सेवाभावी कार्यकर्ते म्हणून ओळखतात. आदिवासींपैकी कुणालाही त्यांच्या वास्तविक शैक्षणिक गुणवत्तेची माहिती नाही. गेल्या ३० वर्षांपासून त्यांच्या या पदव्या एका झोळीत पडून आहेत. मात्र, अलीकडे कारणच तसे घडले की, त्यांच्या या उच्च पदव्यांना जगासमोर यावे लागले.
आलोक सागर यांचे वडील भारतीय महसूल सेवेत अधिकारी होते, तर
आई दिल्ली मिरांडा हाउस येथे भौतिकशास्त्राच्या प्राध्यापिका होत्या. आलोक यांनी १९७३ मध्ये आयआयटी दिल्ली येथून एमटेक केल्यानंतर
1977
मध्ये अमेरिकेच्या ह्युस्टन विद्यापीठातून पीएच.डी मिळविली. याच विद्यापीठात पदव्युत्तर डॉक्टरेट मिळवून कॅनडाच्या डलहौसी विद्यापीठात समाजशास्त्र विभागात फेलोशिप पूर्ण केली. भारतात परतल्यानंतर ते दिल्ली आयआयटी येथे प्रोफेसर म्हणून रूजू झाले. काही काळानंतर नोकरी सोडून ते समाजसेवेकडे वळले.
आदिवासींसाठी काही करण्याची इच्छा बाळगत ते १९९० च्या काळात बैतुलजवळील कोचामाऊ येथे पोहोचले. नव्या आयुष्याची सुरुवात झाली. हळूहळू ते आदिवासींमध्ये मिसळले. आदिवासींनी जवळ यावे, यासाठी त्यांनी उच्चशिक्षित असल्याची ओळख दडवून ठेवली. त्यांनी आदिवासींचे आयुष्य बदलण्यास स्वत: खडतर जीवनाचा मार्ग अवलंबला. आतापर्यंत त्यांनी ५० हजारांवर फळझाडे लावली आहेत. त्याचा लाभ गावकरी, आदिवासींना मिळतो. ते झोपडीत राहतात. विहिरीतून पाणी काढून ते स्वत: झाडांना देतात.
राहायला झोपडी,
फिरायला सायकल...
ते एका झोपडीत राहतात. सायकलवरून या भागात फिरतात. मुलांना शिकवितात. ते बहुभाषी असून आदिवासींची भाषाही शिकले आहेत. ‘मी माझे शिक्षण आणि पदवींबद्दल आदिवासींना सांगितले असते, तर त्यांनी माझ्यापासून अंतर राखले असते,’ असे ते सांगतात. स्वत: हाताने दळण दळतात. आलोक यांचे छोटे बंधू अंबुज
सागर आयआयटी दिल्लीला प्रोफेसर असून, त्यांच्या एक
भगिनी कॅनडामध्ये तर दुसऱ्या भगिनी दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (जेएनयू)
सेवेत होत्या.
>अचानक आले प्रकाशझोतात... सध्या घोडाडोंगरी विधानसभा निवडणुकीची प्रक्रिया सुरू असून, ३० मे रोजी मतदान होणार असल्यामुळे बाहेरील लोकांना हाकलण्यासाठी पोलिसांनी मोहीम छेडली आहे. पोलिसांची वक्रदृष्टी आलोक सागर यांच्यावर पडली आणि लगेच फर्मान धाडले गेले. हा भाग सोडला नाही, तर कारागृहात डांबण्याची धमकी एका पोलिसाने दिली. आलोक सागर हे थेट पोलीस ठाण्यात गेले. त्यांनी पदव्यांची माहिती देताच पोलिसांवर हैराण होण्याची पाळी आली.

Web Title: Ayesha lessons of tribal people giving one time IIT professor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.