Ayodhya Masjid : अयोध्या मशिदीबाबत योगी सरकारचा मोठा निर्णय, बांधकामाबाबत आले 'हे' अपडेट

By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2023 07:55 PM2023-03-04T19:55:40+5:302023-03-04T19:56:54+5:30

Ayodhya Masjid : या जागेत 'इंडो-इस्लामिक कल्चरल फाउंडेशन' ट्रस्ट मशीद, रुग्णालय, संशोधन संस्था, लायब्ररी बांधणार आहे. 

Ayodhya authority gives final approval for construction of a Ayodhya mosque | Ayodhya Masjid : अयोध्या मशिदीबाबत योगी सरकारचा मोठा निर्णय, बांधकामाबाबत आले 'हे' अपडेट

Ayodhya Masjid : अयोध्या मशिदीबाबत योगी सरकारचा मोठा निर्णय, बांधकामाबाबत आले 'हे' अपडेट

googlenewsNext

अयोध्या विकास प्राधिकरणाने (ADA) शुक्रवारी धन्नीपूर मशिदीच्या बांधकामाला अंतिम मंजुरी दिली. बाबरी मशीद-रामजन्मभूमी निकालात सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार उत्तर प्रदेश सरकारने अयोध्या जिल्ह्यातील धन्नीपूर गावात पाच एकर जमीन दिली होती. या जागेत 'इंडो-इस्लामिक कल्चरल फाउंडेशन' ट्रस्ट मशीद, रुग्णालय, संशोधन संस्था, लायब्ररी बांधणार आहे. 

एडीएने मंजूरी न दिल्याने आणि जमिनीच्या वापरात बदल केल्यामुळे मशिदीचे बांधकाम दोन वर्षांहून अधिक काळ रखडले होते. अयोध्येचे विभागीय आयुक्त आणि एडीएचे अध्यक्ष गौरव दयाल यांनी शनिवारी सांगितले की, "आम्ही शुक्रवारी झालेल्या बोर्डाच्या बैठकीत अयोध्या मशिदीच्या प्रकल्पाला मंजुरी दिली आहे. काही विभागीय औपचारिकतेनंतर मंजूर झालेले नकाशे काही दिवसांत इंडो-इस्लामिक कल्चरल फाउंडेशनकडे सुपूर्द केले जातील."

सर्व मंजुरी मिळाल्यानंतर एक बैठक घेतली जाईल आणि मशिदीच्या बांधकामाची योजना अंतिम केली जाईल, असे इंडो-इस्लामिक कल्चरल फाउंडेशन ट्रस्टचे सचिव अतहर हुसैन यांनी सांगितले. तसेच, अहतर हुसैन म्हणाले की, "ट्रस्टची बैठक 21 एप्रिल रोजी संपणाऱ्या रमजाननंतर होणार आहे. त्या बैठकीत मशिदीचे बांधकाम सुरू करण्याची तारीख निश्चित केली जाईल. आम्ही 26 जानेवारी 2021 रोजी मशिदीची पायाभरणी केली होती. अयोध्या मशिदीची पायाभरणी करण्यासाठी आम्ही हा दिवस निवडला, कारण सात दशकांपूर्वी याच दिवशी भारताचे संविधान लागू झाले. धनीपूर मशीद बाबरी मशिदीपेक्षा मोठी असेल. धन्नीपूर मशिदीचे ठिकाण तीर्थनगरीतील राम मंदिराच्या जागेपासून 22 किमी अंतरावर आहे."

दरम्यान, अयोध्या जिल्ह्यातील धन्नीपूर गावात मशीद, रुग्णालय, संशोधन संस्था, सामुदायिक स्वयंपाकघर आणि ग्रंथालयाच्या बांधकामासाठी मंजुरीसाठी जुलै 2020 मध्ये अयोध्या विकास प्राधिकरणाकडे अर्ज करण्यात आला होता. विशेष म्हणजे, 9 नोव्हेंबर 2019 रोजी एका ऐतिहासिक निकालात सर्वोच्च न्यायालयाने अयोध्येतील वादग्रस्त जागेवर राम मंदिर बांधण्याचे आदेश दिले होते आणि सरकारला जिल्ह्यातील प्रमुख ठिकाणी मशीद बांधण्यासाठी पाच एकर जमीन देण्यास सांगितले होते. 

याचबरोबर, दुसरीकडे, अयोध्येत राम मंदिर उभारणीचे काम सुरू आहे. मंदिराच्या बांधकामावर कार्यरत असलेल्या श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टच्या अधिकाऱ्यांनी दावा केला आहे की, मंदिर 2024 मध्ये भाविकांसाठी उघडले जाईल.
 

Web Title: Ayodhya authority gives final approval for construction of a Ayodhya mosque

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.