Ayodhya Case: अयोध्या प्रकरणी सुप्रीम कोर्टाकडून नवी तारीख, नवं खंडपीठ; 10 जानेवारीला सुनावणी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2019 10:58 AM2019-01-04T10:58:12+5:302019-01-04T11:32:43+5:30
अयोध्या प्रकरणी सुप्रीम कोर्टात आज (4 जानेवारी) महत्त्वपूर्ण सुनावणी होणार होती. मात्र ही सुनावणी सुप्रीम कोर्टाने आता आणखी पुढे ढकलली आहे. या प्रकरणी नव्या पीठाची नियुक्ती होणार असल्याने आजची सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे.
नवी दिल्ली - अयोध्या प्रकरणी सुप्रीम कोर्टात आज (4 जानेवारी) महत्त्वपूर्ण सुनावणी होणार होती. मात्र ही सुनावणी सुप्रीम कोर्टाने आता आणखी पुढे ढकलली आहे. या प्रकरणी नव्या पीठाची नियुक्ती होणार असल्याने आजची सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. 10 जानेवारी रोजी नव्या पीठाची नियुक्ती होणार असून त्यानंतर या प्रकरणाची सुनावणी होणार आहे. सध्या जे पीठ या प्रकरणाची सुनावणी घेत होतं, त्यातील एक न्यायमूर्ती निवृत्त झाल्याने नव्या पीठाची नियुक्ती करणं आवश्यक आहे, यामुळेच या प्रकरणाची सुनावणी 10 जानेवारीपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. अवघ्या 1 मिनिटात सुप्रीम कोर्टाने हा निर्णय दिला आहे.
सुप्रीम कोर्टाने नोव्हेंबरमध्ये या प्रकरणाशी संबंधित याचिकांवर लवकर सुनावणी घेण्यास नकार दिला होता. या प्रकरणात जानेवारीपासून सुनावणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोर्टाकडे सध्य अन्य प्रकरणेही असल्याचे सांगितले होते. अलाहाबाद हायकोर्टाच्या तीन सदस्यीय खंडपीठाने 30 सप्टेंबर 2010 मध्ये 2.77 एकर जमीन तीन पक्षकारांमध्ये म्हणजेच सुन्नी वक्फ बोर्ड, निर्मोही आखाडा आणि राम लल्ला यांच्यामध्ये समान वाटण्याचा निर्णय दिला होता. या निर्णयाविरोधात 14 पेक्षा जास्त याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. सुप्रीम कोर्टाने 9 मे 2011 मध्ये या निर्णयाला स्थिगिती दिली होती.
The title suit in the Ayodhya case will be heard on January 10. A bench led by Chief Justice of India Ranjan Gogoi announced the date in a 60-second hearing, which did not see any arguments from either side.
— ANI Digital (@ani_digital) January 4, 2019
Read @ANI Story | https://t.co/swAVKoDSh9pic.twitter.com/3ghQ5ZTmTN
राम मंदिरासाठी सरकारवर वाढता दबाव
लोकसभा निवडणूक जवळ येत असल्याने राम मंदिरासाठी पुन्हा मागणी जोर पकडू लागली आहे. हिंदुत्ववादी संघटना ठिकठिकाणी बैठका, सभा घेत असल्याने केंद्र सरकारवरील दबाव वाढत आहे. संघानेही राम मंदिरासाठी वेगळा कायदा आणण्याची मागणी केली आहे.
Supreme Court also dismissed a PIL seeking to hear the Ayodhya matter on urgent and day to day basis. The PIL was filed by an advocate Harinath Ram in November 2018. pic.twitter.com/eHK9N1Rr8H
— ANI (@ANI) January 4, 2019
Ayodhya case: The hearing which continued for 60 seconds, did not see any arguments from either side https://t.co/r1zkutnjuQ
— ANI (@ANI) January 4, 2019
Supreme Court hearing on January 10th on the Constitution of a bench to hear the Ayodhya matter pic.twitter.com/1593lBReKC
— ANI (@ANI) January 4, 2019