अयोध्या प्रकरणाची सुनावणी पुन्हा लांबणीवर, 29 जानेवारीला एक न्यायमूर्ती राहणार अनुपस्थित

By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2019 05:42 PM2019-01-27T17:42:28+5:302019-01-27T17:53:34+5:30

अयोध्या प्रकरणाची 29 जानेवारीला होणारी सुनावणी दिवस पुन्हा एकदा लांबणीवर पडली आहे. या प्रकरणाच्या सुनावणीसाठी नियुक्त करण्यात आलेल्या घटनापीठातील एक न्यायमूर्ती 29 जानेवारी रोजी अनुपस्थित राहणार असल्याने ही सुनावणी टळली आहे.

Ayodhya case won't be taken up for hearing in Supreme Court on January 29 due to the non-availability of Justice SA Bobde | अयोध्या प्रकरणाची सुनावणी पुन्हा लांबणीवर, 29 जानेवारीला एक न्यायमूर्ती राहणार अनुपस्थित

अयोध्या प्रकरणाची सुनावणी पुन्हा लांबणीवर, 29 जानेवारीला एक न्यायमूर्ती राहणार अनुपस्थित

Next
ठळक मुद्देअयोध्या प्रकरणाची 29 जानेवारीला होणारी सुनावणी दिवस पुन्हा एकदा लांबणीवर पडली आहे घटनापीठापमध्ये असलेले न्यायमूर्ती एस. ए. बोबडे हे 29 जानेवारीला अनुपस्थित राहणार आहेत. त्यामुळे या दिवशी होणारी अयोध्या प्रकरणाची सुनावणी होणार नाहीया प्रकरणाच्या याआधी झालेल्या सुनावणी वेळी न्यायमूर्ती  उदय ललित यांनी पाच सदस्यीय घटनापीठातून माघार घेतली होती

नवी दिल्ली - अयोध्या प्रकरणाची 29 जानेवारीला होणारी सुनावणी दिवस पुन्हा एकदा लांबणीवर पडली आहे. या प्रकरणाच्या सुनावणीसाठी नियुक्त करण्यात आलेल्या घटनापीठातील एक न्यायमूर्ती 29 जानेवारी रोजी अनुपस्थित राहणार असल्याने ही सुनावणी टळली आहे. दोन दिवसांपूर्वीच या प्रकरणाची सुनावणी करण्यासाठी सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी पाच सदस्यीच घटनापीठाची स्थापना केली होती. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाचे अॅडिशनल रजिस्ट्रार (लिस्टिंग) यांनी प्रसिद्ध केलेल्या सूचनेनुसार घटनापीठापमध्ये असलेले न्यायमूर्ती एस. ए. बोबडे हे 29 जानेवारीला अनुपस्थित राहणार आहेत. त्यामुळे या दिवशी होणारी अयोध्या प्रकरणाची सुनावणी होणार नाही. 





  दरम्यान, या प्रकरणाच्या याआधी झालेल्या सुनावणी वेळी न्यायमूर्ती  उदय ललित यांनी पाच सदस्यीय घटनापीठातून माघार घेतली होती. न्या. ललित यांनी घटनापीठातून बाहेर पडण्याची इच्छा व्यक्त केल्याने 29 जानेवारीला नवीन घटनापीठासमोर या प्रकरणाची सुनावणी होणार होती. याच खटल्यामध्ये यापूर्वी वकील म्हणून काम केल्यामुळे ललित यांनी हा निर्णय घेतला होता. 

दरम्यान, मुस्लिम पक्षाचे वकील राजीव धवन यांनी पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठावर आक्षेप नोंदवला. धवन यांनीच न्या. उदय ललित यांचाही मुद्दा उपस्थित केला. पाच न्याधीशांच्या घटनापीठामध्ये समावेश असलेले न्यायाधीश उदय ललित हे याप्रकरणी संबंधित असलेले आरोपी कल्याण सिंह यांची बाजू मांडण्यासाठी 1997 साली वकील म्हणून उपस्थित होते, असे सांगत वकील राजीव धवन यांनी आक्षेप घेतला. राजीव धवन यांच्या आक्षेपानंतर न्यायाधीश उदय ललित यांनी या घटनापीठातून माघार घेतली.  

Web Title: Ayodhya case won't be taken up for hearing in Supreme Court on January 29 due to the non-availability of Justice SA Bobde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.